Shocking Video । मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) कोणतीच गोष्ट गुपित राहू शकत नाही. सध्या एक व्हिडीओ (Viral Video) खूप व्हायरल होत आहे जो व्हिडीओ पाहून कदाचित तुम्हाला देखील जोरात धक्का बसेल. कारण एका कामगाराने वेगाने असलेल्या ट्रेनमधून एका प्रवाशाचा मोबाईल लंपास केला आहे. या घटनेचा सर्व थरार कॅमेरात कैद झाला असून मोबाईल कसा गेला याची कल्पना केल्यावर देखील प्रवाशाच्या तोंडावर बारा वाजल्याचे पाहायला मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही घटना कोणत्या दिशेने घडली, फोन कधी हिसकावला, याचा अंदाज बांधणे देखील कठीण होते. (incident of mobile theft from a speeding train has been captured on camera).
अधिक वाचा : ओ शेठ! तुम्ही 'स्ट्रॉ'च बंद केला थेट! -'अमुल'चं PMO ला पत्र
दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ बिहारमधील बेगुसरायचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ तुम्ही नीट पाहिल्यावरच घटनेचा थरार तुमच्या लक्षात येईल. अन्यथा काहीच कळणार नाही. कारण ज्या प्रवाशाचा मोबाईल लंपास झाला आहे त्याच्या बाजूच्या प्रवाशाला देखील याची चाहूल लागली नाही. ट्रेनच्या दरवाजात दोन प्रवासी बसलेले तुम्ही पाहू शकता. एक माणूस फोनवर काहीतरी पाहत आहे. गाडी पुलावरून आपल्या वेगात जात आहे. तेवढ्यात पुलाच्या रेलिंगला लटकलेला एक माणूस बुलेटच्या वेगाने फोन हिसकावतो. ज्याच्याकडून फोन हिसकावला त्यालाही समजत नाही की शेवटी काय झाले? तसेच समोरच्या व्यक्तीला देखील मोबाईल गेल्याचे समजल्यावर धक्का बसतो.
तुम्हाला ही घटना पाहताच क्षणी समजली नसेल. पण, हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये पाहिल्यानंतर ही धक्कादायक घटना लक्षात येईल. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. काहींचा अजूनही डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तर काही लोक म्हणतात की या चोरट्यासमोर वेग काय आहे. या प्रकारचा व्हिडीओ तुम्ही याआधी कदाचित पाहिलाही नसेल.