महसूल अधिकाऱ्याने बजेट फोटोशूटसाठी सुचविली जागा, सजेशन झाले व्हायरल

Indian Revenue Service Officer suggest a place for a budget photo shoot, suggestion went viral : एका महसूल अधिकाऱ्याने अलिकडेच पत्नीच्या समाधानासाठी पोस्ट वेडिंग शूट केले. या फोटोशूटनंतर त्याने बजेट फोटोशूटसाठी ट्वीट करून एक जागा सुचविली.

Indian Revenue Service Officer suggest a place for a budget photo shoot
महसूल अधिकाऱ्याने बजेट फोटोशूटसाठी सुचविली जागा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महसूल अधिकाऱ्याने बजेट फोटोशूटसाठी सुचविली जागा
  • सजेशन झाले व्हायरल
  • बजेट फोटोशूटचे फोटो पण झाले व्हायरल

Indian Revenue Service Officer suggest a place for a budget photo shoot, suggestion went viral : कोणी मनोरंजनसृष्टीत काम मिळविण्यासाठी तर कोणी गंमत म्हणून फोटोशूट करून घेतात. काही जण वाढदिवस, लग्न या निमित्ताने फोटोशूट करून घेतात. प्री वेडिंग आणि पोस्ट वेडिंग फोटोशूट हे ट्रेंड पण आता प्रचंड लोकप्रिय होत आहेत. एका महसूल अधिकाऱ्याने अलिकडेच पत्नीच्या समाधानासाठी पोस्ट वेडिंग शूट केले. या फोटोशूटनंतर त्याने बजेट फोटोशूटसाठी ट्वीट करून एक जागा सुचविली. भारत सरकारच्या महसूल अधिकाऱ्याने केलेल्या या सूचनेवर ट्विटरच्या माध्यमातून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अधिकाऱ्याने बजेट फोटोशूटच्या जागेवर काढलेले निवडक फोटो पण ट्वीट केले आहेत. हे फोटो व्हायरल होत आहेत. 

भारत सरकारच्या महसूल अधिकाऱ्याच्या पत्नीची पोस्ट वेडिंग फोटोशूट करून घेण्याची इच्छा होती. महसूल अधिकाऱ्याने पत्नीची इच्छा पूर्ण करण्याची तयारी दाखवली. पण बजेटमध्ये फोटोशूट करून घेण्यासाठी एक भन्नाट आयडिया केली. 

महसूल अधिकाऱ्याने बजेट फोटोशूटसाठी मुंबईतील एका ठिकाणाची निवड केली. हे ठिकाण होते गेट वे ऑफ इंडिया. गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी अनेक फोटोग्राफर फिरत असतात. हे फोटोग्राफर 30 रुपयांत एक या दराने छान रंगीत फोटो काढून देतात. डिजिटल कॅमेरा वापरून फोटोग्राफर 30 रुपयांत झटपट फोटो काढतात आणि त्याची कॉपी ग्राहकाला देतात. 

निवडक फोटोंसाठी प्रति फोटो 30 रुपये या प्रमाणे मोजकी रक्कम मोजणे शक्य होते. यामुळेच महसूल अधिकाऱ्याने बजेट फोटोशूटसाठी गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणाची निवड केली. गेट वे ऑफ इंडिया येथे महसूल अधिकाऱ्याने अनुभवी फोटोग्राफरकडून 30 रुपये प्रति फोटो या दराने फोटोशूट करून घेतले. पतीने इच्छा पूर्ण केली म्हणून पत्नी खूष झाली तर पत्नी खूष झाल्याचे बघून पतीला बरे वाटले. 

बापरे, तिखट खाल्ल्यामुळे शिंक येऊन तुटल्या 4 बरगड्या

VIRAL VIDEO: टॉवेल गुंडाळून थेट शिरला मेट्रोत आणि केलं असं काही की....

मार्मिक प्रतिक्रिया

महसूल अधिकाऱ्याने सांगितलेल्या बजेट फोटोशूटच्या पर्यायाचे अनेकांनी स्वागत केले. एकाने पत्नीला या पर्यायासाठी तयार करणाऱ्या महसूल अधिकाऱ्याचे कौतुक केले. यावर महसूल अधिकाऱ्याने मी हवाई चप्पल घालून वावरत होतो तेव्हापासून पत्नी माझ्यासोबत ठामपणे, स्वखुषीने आणि आनंदाने उभी असल्याची माहिती दिली. परिस्थिती चांगली असो वा वाईट पत्नीची साथ कायम असल्याचे संबंधित महसूल अधिकारी म्हणाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी