Memes Consumption Increased : मीम्स बघण्यात ८० टक्क्यांनी वाढ, भारतीय नेटकरी दररोज अर्धा तास मीम्स बघण्यात घालवतात

ताण दूर करण्यासाठी भारतातील नेटकरी मीम्सचा आधार घेत आहेत. नेटकरी दिवसाला सरासरी तीस मिनिटे मीम्स बघण्यात घालवात. गेल्या वर्षीच्या तुलनेत मीम्स बघण्याच्या प्रमाणात तब्बल ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जसे जसजसे नवे मीम्स येतात त्याच प्रमाणे मीम बनवण्याच्या ऍप्समध्येही वाढ होत आहे.

viral meme
व्हायरल मीम्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ताण दूर करण्यासाठी भारतातील नेटकरी मीम्सचा आधार घेत आहेत.
  • नेटकरी दिवसाला सरासरी तीस मिनिटे मीम्स बघण्यात घालवात.
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत मीम्स बघण्याच्या प्रमाणात तब्बल ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

80 Percent Increase In Consumption Of Memes: ताण दूर करण्यासाठी भारतातील नेटकरी मीम्सचा आधार घेत आहेत. नेटकरी दिवसाला सरासरी तीस मिनिटे मीम्स बघण्यात घालवात. गेल्या वर्षीच्या तुलनेत मीम्स बघण्याच्या प्रमाणात तब्बल ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जसे जसजसे नवे मीम्स येतात त्याच प्रमाणे मीम बनवण्याच्या ऍप्समध्येही वाढ होत आहे. रेडसीर या स्ट्रॅटर्जी कन्सल्टन्सीने याबाबत संशोधन केले होते. या संशोधनाच्या अहवालानुसार ताण कमी करण्यासाठी नेटकरी मीम्स बघतात. नेटकर्‍यांना दररोज नवनवीन मीम्स हवे असतात असे या अहवालात म्हटले आहे. (indian wath daily 30 minutes memes 80 percent hike in meme consumption)

अधिक वाचा :  कैद्यानं एकाच वेळी दोघींना पाडलं प्रेमात, तुरुंगाधिकाऱ्यांशी बॅरेकमध्येच करायचा सेक्स

रेडसीच्या अहवालानुसार भारतीय स्मार्टफोन युजर आपला ताण विसरण्यासाठी मीम्स पाहणे पसंत करतात. भारतीय इंटरनेट युजर दिवसाला सरासरी ३० मिनिटे मीम्सचा आस्वाद घेतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्क्यांनी मीम्स बघण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज नवनवीन आणि मनोरंजक मीम मिळावे अशी नेटकर्‍यांची इच्छा असते. मीम्सचा खप वाढत असल्याने मीम्स बनवणार्‍या ऍप्सची संख्याही वाढली आहे. सध्या मीम हा प्रकार फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. खुप सार्‍या लोकांना मीम्सच्या माध्यमातून लोक स्वतःला रिलेट करतात. त्यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत मीम्स बघण्याचे, फॉरवर्ड करण्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी वाढले आहे. 

अधिक वाचा :  Optical Illusion : पुस्तकांमध्ये लपली आहे पेन्सील; १५ सेकंदात दाखवा शोधून, ९९ टक्के लोक झाले फेल

मीम्सचा बोलबाला
मनोरंजन क्षेत्रात सध्या मीम्सचा बोलबाला आहे. मीम्स बनवण्यासाठी बाजारात सध्या वेगवेगळे ऍप्सही उपलब्ध आहेत. त्यात लोक आपली क्रिएटिविटी दाखवून मीम्स बनवत आहेत आणि सोशल मीडियावर शेअर करत आहेत. मीम्स बनवणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. जे लोक स्वतःचा ब्रॅण्ड विकसित करत आहेत ते मीम्सच्या माध्यमातून आपल्या प्रोडक्ट्सची जाहिरात करत आहेत आणि ग्राहकांना आकर्षित करत आहेत. 

अधिक वाचा :  Shocking Accident : बंदूकधारी बाईकस्वारांची कारचालकाला धमकी, काही क्षणांत मिळाली शिक्षा, पाहा VIDEO

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी