Indian Wedding Viral Video: लग्नाच्या वरातीत काही ठिकाणी घोडी नाचवली जाते, तर काहीवेळा वर स्वतः घोडीवर स्वार होऊन विचित्र पराक्रम करताना दिसतो. तर काही वेळा वधू-वरांव्यतिरिक्त त्यांचे मित्रच कारनामे करून जातात. असाच एका वरातीचा व्हीडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तो व्हीडियो पाहून तुम्ही देखील हरखून जाल.
अधिक वाचा: UPI Lite: आता ऑफलाइन UPI पेमेंट झाले शक्य, जाणून घ्या पद्धत
या विचित्र व्हिडिओमध्ये नवरदेव घोडीवर स्वार झालेला दिसतो आहे. पण ती घोडी चक्क एका चारपायी खाटेवर उभी आहे, आणि कहर म्हणजे ही खाट चारही बाजूंनी वराच्या मित्रांनी घेरलेली आहे. पुढे ही सर्व मित्र मिळून घोडीसह खाट उचलतात आणि गोल फिरवतात.
अधिक वाचा : गॅंगस्टरच्या जीवनावर बनलेली वेब सिरीज
व्हिडिओमध्ये घोडीवर स्वार झालेली व्यक्ती तिची धडपडणारी पावले हाताळताना दिसत आहे, जे पाहून तेथे उपस्थित असलेले लोकही थक्क झाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात हाच प्रश्न निर्माण होत असेल की, हे करण्याची काय गरज होती.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ravirajsinh_rajput_0007 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ यावर्षी 20 मार्च रोजी शेअर करण्यात आला होता, ज्याला आतापर्यंत 8 लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर 61 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडीओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, 'एक अर्धा शहाणा तरी आणला असता.' तर आणखी एका युजरने लिहिले की, 'आता हेच बघायचे बाकी होते.'