इंदोरच्या पोलिसाची मायकल जॅक्सनशी तुलना, हा नवा डांसिंग COP, स्टाइलमध्ये करतो ट्रैफिक कंट्रोल

The traffic police popular for his unique style :मध्य प्रदेशातील इंदूर येथील ट्रॅफिक कॉन्स्टेबल आपल्या खास शैलीने लोकप्रिय आहेत. शहराच्या गजबजलेल्या चौकाचौकात वर्षांनंतरही तो आपल्या नृत्याने वाहतूक नियंत्रित करताना दिसतो. मायकल जॅक्सनच्या प्रसिद्ध 'मून वॉक'मध्ये रणजीत ट्रॅफिक नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या नृत्य मुद्रांचा वापर करतो.

Indore Police Compare Michael Jackson, This New Dancing COP, In Style Controls Traffic
इंदोरच्या पोलिसाची मायकल जॅक्सनशी तुलना, हा नवा डांसिंग COP, स्टाइलमध्ये करतो ट्रैफिक कंट्रोल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इंदूर येथील ट्रॅफिक कॉन्स्टेबल आपल्या खास शैलीने लोकप्रिय आहेत.
  • ते आपल्या नृत्याने वाहतूक नियंत्रित करतात
  • मायकल जॅक्सनच्या प्रसिद्ध 'मून वॉक'मध्ये रणजीत ट्रॅफिक नियंत्रित करतात.

The traffic police popular for his unique style इंदोर : सोशल मीडियाच्या जगात कधी, काय बघायला मिळेल, काहीच सांगता येत नाही? कधी कधी गोष्टी इतक्या मजेशीर असतात, की पाहून चेहऱ्यावर हसू येते. त्याच वेळी, काही गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीण होते. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये एक ट्रॅफिक पोलिस ज्या स्टाईलने आपले कर्तव्य बजावत आहे ते पाहून लोक थक्क झाले. मात्र, लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला असून तो पुन्हा पुन्हा पाहत आहेत. (Indore Police Compare Michael Jackson, This New Dancing COP, In Style Controls Traffic)

https://youtu.be/ZDQXPQCfTu4

प्रत्येक माणसामध्ये काहीतरी वेगळे आणि खास असते. अनेकजण सर्वांसमोर प्रतिभा दाखवू शकतात, तर काहींना संधी मिळत नाही. आता हा व्हायरल व्हिडीओ पाहा, कसा स्टाईल मारून एक ट्रॅफिक पोलीस आपले कर्तव्य बजावत आहे. कधी तो हात दाखवून वाहनांना पुढे जायला सांगतो, तर कधी कंबर हलवत मागे वळून पाहतो. ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याला पाहून तो नाचतोय असा भास होतो. त्याची स्टाइल लोकांना खूप आवडते.  हा मजेदार व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. इतकेच नाही तर काही लोकांना पोलिस कर्मचाऱ्याची स्टाईल इतकी आवडली की त्याची तुलना सुपरस्टार मायकल जॅक्सनशी केली जात आहे. 

मध्य प्रदेशातील इंदूर येथील ट्रॅफिक कॉन्स्टेबल रणजित सिंग हे आपल्या खास शैलीने देशात आणि जगात लोकप्रिय आहेत. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. शहराच्या गजबजलेल्या चौकाचौकात आपल्या नृत्याने वाहतूक नियंत्रित करताना दिसतो. मायकल जॅक्सनच्या प्रसिद्ध 'मून वॉक'मध्ये रणजीत ट्रॅफिक नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या नृत्य मुद्रांचा वापर करतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी