Inspirational Story : आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी लेकीला काढलं घराबाहेर, आजीकडे राहून मिळवले 99.4%, डोळ्यांत पाणी आणणारी गोष्ट

कोवळ्या वयात अनेक संकटं तिच्या आयुष्यात आली. लहानपणी आई वारली. वडिलांनी हाकलून दिलं. तरीही मेहनत करत तिने दहावीच्या परीक्षेत 99.4 टक्के गुण मिळवले.

Inspirational Story
आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी काढलं घराबाहेर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आईचा मृत्यू, वडिलांनी दिले हाकलून
  • संघर्ष करून श्रीशाने मिळवले 99.4 टक्के गुण
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Inspirational Story : ज्याची कष्ट करण्याची (Struggle) तयारी असते, त्याच्या आयुष्यात कितीही संकटं आली तरी तो यशस्वी होतोच, असं म्हटलं जातं. श्रीशा (Shirsha) नावाच्या मुलीनं हे सिद्ध करून दाखवलं आहे. आईच्या मृत्यतूनंतर (Death of mother) पोरक्या झालेल्या श्रेयाला तिच्या वडिलांनीही नाकारलं (Father denied responsibility) आणि आयुष्याचा फार मोठा प्रश्न तिच्यासमोर कोवळ्या वयात निर्माण झाला. मात्र याचा कुठलाही परिणाम होऊ न देता ज्या जिद्दीने तिने अभ्यास केला आणि आपलं आयुष्य पुन्हा यशाच्या ट्रॅकवर आणलं, त्याबद्दल तिचं सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत आहे. तिच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Video viral on social media) जोरदार व्हायरल होत आहे.

आईच्या मृत्यूमुळे संकट

श्रीशा लहान असतानाच तिच्या आईनं निधन झालं. त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न कऱण्याचा निर्णय घेतला आणि चिमुकल्या श्रीशाला घरातून हाकलून दिलं. कुठे जावं, काय करावं, याचा विचार करण्याएवढीदेखील श्रीशा मोठी नव्हती. आपल्या नातीचा सांभाळण्याचा निर्णय अखेर तिच्या आजीने म्हणजेच आईच्या आईने घेतला आणि तिला घरी आणलं. आजीआजोबांच्या देखरेखीखाली श्रीशा लहानाची मोठी होऊ लागली होती. 

अभ्यासात हुशार

कोवळ्या वयात आई गेल्यानंतर आणि वडिलांनी घरातून हाकलून दिल्यानंतर कुठल्याही लहान मुलाच्या मनावर गंभीर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. या धक्क्यातून सावरणं लहान मुलांना सहजासहजी शक्य होत नाही. आईची सतत आठवण येत राहिल्यामुळे कशातच त्यांच मन रमू शकत नाही. अशा परिस्थितीत स्वतःला सावरत श्रीशानं आपलं मन अभ्यासात गुंतवलं. दिवसभर शाळा आणि इतर वेळात अभ्यास करत ती वर्गातील सर्वात हुशार मुलगी बनली होती. दहावीच्या परीक्षेतही तिची चुणूक दिसून आली. या परीक्षेत तिने 99.4 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलं. 

अधिक वाचा - Please slow down : चिखलातून वेगाने गाडी चालवणाऱ्यांनो, जरा विचार करा! या मुलीचा फोटो पाहून वाटेल वाईट!

आजीने दिली प्रतिक्रिया

या निकालानंतर श्रीशाच्या आजीने अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे. श्रीशाच्या वडिलांना आता तरी स्वतःची चूक समजली असेल, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे. आम्ही आम्हाला जमेल तेवढी मेहनत करून श्रीशाला शिकवलं. तिने एवढं घवघवीत यश मिळवल्याचं पाहून समाधान वाटत असल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत. आईवडीलांचं छत्र हरपणं याहून लहान मुलांसाठी मोठा धक्का इतर कुठलाच असू शकत नाही. त्यावर मात करत श्रीशाने मोठं यश संपादन केलं.

अधिक वाचा - Deathpool:  या स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेल्यावर जातो जीव, नव्या जलाशयाच्या शोधामुळे उलगडतील अनेक रहस्यं

व्हिडिओ होतोय व्हायरल

हा व्हिडिओ भाजप खासदार वरुण गांधींनी ट्विट केला आहे. या मुलीसाठी काहीही मदत आपण करू शकलो, तर स्वतःला भाग्यवान समजू, असं त्यांनी म्हटलं आहे. अनेकांनी श्रीशाचं तिने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी