तरुणीने २ कोटी रुपयाची अंगठी घेतली आणि त्याची 'ती' मागणी धुडकावली! 

2 Crore Rupees Ring: इंस्टाग्राम मॉडेल अमंडाला एका व्यक्तीने तब्बल २ कोटीचीं अंगठी देऊन मागणी घातली होती. पण यावेळी अमंडाने अंगठी स्वत: जवळ ठेऊन घेतली आणि त्याची मागणी धुडकावली.  

instagram model kept the 2 crore rupees ring but turned down the proposal
तरुणीने २ कोटी रुपयाची अंगठी घेतली आणि त्याची 'ती' मागणी धुडकावली!   |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • इंस्टाग्राम मॉडेलच्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीने दिली २ कोटींची अंगठी
  • अंगठी स्वीकारुन मॉडेलने धुडकावला त्याचा प्रस्ताव
  • मॉडेलला अंगठी देणारा व्यक्ती उत्तर युरोपमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असल्याची माहिती

लंडन: एका व्यक्तीने एका मॉडेल तरुणीला तब्बल २ कोटी रुपयांची हिऱ्याची अंगठी देऊन मागणी घातली होती. यावेळी तरुणीने २ कोटीची अंगठी तर स्वत:जवळ ठेऊन घेतली पण त्या तरुणाची लग्नाची मागणी मात्र धुडकावून लावली. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, लंडनमध्ये राहणारी मॉडेल अमंडा क्रोनिनला एका अनोळखी व्यक्तीने रिलेशनशिपचा प्रस्ताव दिला होता. दोघे पहिल्यांदाच न्यूयॉर्कमधील एका हॉटेलमध्ये भेटले होते. 

अनोळखी व्यक्तीने अमंडाला Van Cleef & Arpels ब्रँडची अत्यंत महागडी अशी अंगठी भेट दिली होती. या अंगठीची किंमत ही तब्बल २ कोटी ३३ रुपये एवढी आहे. अमंडा ही इंस्टाग्राम मॉडेल म्हणून प्रसिद्ध आहे. यावेळी अमंडाने सांगितलं की, प्रपोज करणारा व्यक्ती हा उत्तर युरोपमधील सर्वात पॉवरफुल लोकांपैकी एक आहे. 

या संपूर्ण घटनेबाबत अमंडाने अशी माहिती दिली की, 'मला असं लक्षात आलं की, एक खूपरच आकर्षक व्यक्ती हा माझ्याशी नजर भिडवत आहे. अचानक त्याने मला त्यांचं नाव सांगितलं आणि मोबाइल नंबर दिला.' यानंतर अमंडाने दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तीला एक मेसेज पाठवला. ज्यानंतर त्या व्यक्तीचे अनेक मेसेज येऊ लागले. ज्यामध्ये त्याने अनेक प्रेमाचे मेसेज देखील पाठवले होते. 

याबाबत अमंड पुढे असंही म्हणाली की, 'मला माहित पडलं की, त्या व्यक्तीचं लग्न झालं आहे. यानंतर अमंडाने त्या व्यक्तीला सांगितलं की, ती त्याला भेटू शकत नाही. यानंतर त्या व्यक्तीने आपणं आपलं लग्न मोडण्यास तयार असल्याचंही अमंडाला सांगितलं. यानंतर त्याने अमंडाला मागणीही घातली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Winter White Today! Happy Friday !

A post shared by Amanda Caroline Cronin (@amandacarolinecronin) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Loving the Tent today at the Beach Club with my @amore2112 funny weather in monaco very tropical ?

A post shared by Amanda Caroline Cronin (@amandacarolinecronin) on

यानंतर तो व्यक्ती अमंडाला लंडनमध्ये येऊन भेटला. यावेळी त्याने तिला अत्यंत महागडी अंगठी भेट दिली. याबाबत अमंडा म्हणाली की, 'हे खूपच विचित्र घडत होतं. मी अंगठी त्याला परत करणार होते. पण त्या व्यक्तीने मला सांगितलं की, जर ती अंगठी ठेवून घेतलीस तर मला बरं वाटेल.' अमंडा सध्या कॅनडामध्ये एका व्यक्तीला डेट करत आहे. पण तिने आपल्या पार्टनरचं नाव जाहीर केलेलं नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी