दारू न दिल्याने इंस्टाग्राम मॉडलचा राडा, दिली विमान उडवण्याची धमकी

एअर न्युझीलंडच्या विमानात एक विचित्र घटना घडली आहे. या विमानातील महिला प्रवाशीने वाईन न मिळाल्याने चक्क विमान उडविण्याची धमकी दिली.

Instagram model threatens to blow up plane if no alcohol is not offer
दारू न दिल्याने इंस्टाग्राम मॉडलचा राडा  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • वाईन दिली नाही म्हणून महिलेचा विमानात राडा
  • दारूची मागणारी महिला इंस्टाग्राम मॉडल
  • एअर न्यूझीलंडच्या क्रू सदस्यांना महिलेची शिवीगाळ

एअर न्युझीलंडच्या विमानात एक विचित्र घटना घडली आहे. या विमानातील महिला प्रवाशीने वाईन न मिळाल्याने चक्क विमान उडविण्याची धमकी दिली. याप्रकरणी विमानातील क्रूने तिला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिलं हातकड्या घातल्या. विमानात राडा करणारी महिला ही इंस्टग्राम मॉडेल असून तिचं नाव हन्ना ली पियर्सन (Hannah Lee Pierson) असे आहे.

पियर्सन यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी एअर न्युझीलंडच्या विमानात राडा केला होता. विषयीचे वृत्त News.com.au दिले आहे, वृत्तानुसार, क्रूने जेवण आणि खाण्याचे वस्तू प्रवाशांना देत होते. तेव्हा इंस्टाग्राम मॉडल पियर्सनने एक ग्लास वाईनची मागणी केली. पण त्यांच्या तिकिटात दारूचे पैसे कापलेले नव्हते. यामुळे त्यांना दारू मिळणार नाही, असं पायलट आणि क्रू सदस्यांनी सांगितले. जर दारू घ्यायची असेल तर अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. त्यानंतर इंस्टग्राम मॉडलने फ्लाइट क्रूच्या एका सदस्यासोबत गैरव्यवहार केला होता. 

न्यायालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पियर्सनला दारू देण्याचं नाकारण्यात आलं तेव्हा ती ओरडू लागली आणि शिव्या देऊ लागली. मला काही फरक पडत नाही, मला वाईन आणा. त्यानंतर मॉडल उभी राहत ओरडू लागली मी स्वता घेऊन येते. यादरम्यान तिला थांबवण्यासाठी गेलेल्या एका क्रू सदस्याला तिचं डोकं लागलं.
त्यानंतर मॉडल ओरडू लागली, मला वाईन द्या नाहीतर मी विमान उडवून देईन. त्यानंतर चालक दलाच्या सदस्यांनी पीयर्सनला हातकड्या घालण्याचा निर्णय घेतला. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी