Viral Video : रेल्वे स्टेशनवर भेळपुरी विकणारी महिला रातोरात झाली फेमस, या Instagram Reel ने केली कमाल

सध्या लिप-सिंक करण्याची कला भारतात जोर धरत असून या कलेवर अनेकजण रातोरात प्रसिद्ध होत आहेत. याच यादीत आता रेल्वे स्टेशनवर भेळपुरी विकणाऱ्या महिलेनं मानाचं स्थान पटकावलं आहे.

Viral Video
रेल्वे स्टेशनवर भेळपुरी विकणारी महिला रातोरात फेमस  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रेल्वे स्टेशनवर भेळपुरी विकणाऱ्या महिलेचा व्हिडिओ
  • रातोरात महिला झाली फेमस
  • हिंदी गाण्यावर अप्रतिम लिप-सिंक

Viral Video : सोशल मीडिया (Social Media) ही अशी जागा आहे, जिथं कुणीही रातोरात प्रसिद्ध (Famous) होऊ शकतो. कुणाचाही एखादा व्हिडिओ इतका प्रसिद्ध होतो की एका रात्रीत लाखो, कोट्यवधी लोकांपर्यंत तो पोहोचतो. भारतात अनेकांकडे आलेले स्मार्ट फोन आणि स्वस्तात उपलब्ध असणाऱ्या इंटरनेटमुळे (Smartphone and cheap internet) गेल्या काही वर्षात प्रत्येकालाच सोशल मीडियावर फेमस होण्याची इच्छा असते. त्यासाठी आपल्यातली कला कुठल्या ना कुठल्या प्रकारे सादर करून सोशल मीडियावर झळकण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. एका रेल्वे स्टेशनवर भेळपुरी विकणाऱ्या एका महिलेचा असाच एक व्हिडिओ रातोरात प्रसिद्ध (Famous Video) झाला आहे. एका हिंदी सिनेमाच्या गाण्यावर लिप-सिंक (Lip sync) करून तिने हा व्हिडिओ तयार केला आणि इन्स्टाग्रामवर अपलोड केला.

रातोरात फेमस

रातोरात सोशल मीडियावर फेमस झालेल्या अनेक व्यक्ती यापूर्वीही आपण पाहिल्या आहेत. ‘कच्चा बादामा’फेम भुवन बड्याकर असो, रातोरात एका गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली रानू मंडल असो किंवा ‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ या गाण्याने देशभर चर्चेत आलेला सहदेव दिरदो असो. सोशल मीडियावर अनेकांनी आपापली कलाकृती सादर केली आणि बघता बघता त्यांना लाखो फॉलोअर्स मिळाले, अशी उदाहरणं दिसतात. हे असं माध्यम आहे, जिथं कुणी कधी व्हायरल होईल काही सांगता येत नाही. काहींना वर्षानुवर्षं प्रयत्न करूनही त्यात यश येत नाही, तर काहीजणांचे मात्र एखादाच व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्यांचं आयुष्यच बदलून जातं. 

अधिक वाचा - आइस्क्रीम खाताना इराणी महिलेने  केले असं काही की सरकारने महिलांना जाहिरातींवर बंदी घातली, पाहा व्हिडिओ

महिलेचे जबरदस्त हावभाव

सध्या फेमस होत असलेल्या व्हिडिओत रेल्वे स्टेशनवर भेळपुरी विकत बसलेली महिला एका गाण्यावर लिप-सिंक करताना दिसते. ‘ये जो तेरे पायलोंकी खनखन है’ या गाण्यावर तिने आपली अदाकारी सादर केली आहे. आपल्या समोर ठेवलेल्या भेळपुरीतील काही सामान नीटपणे लावून घेता घेता हे गाणं सुरू होतं आणि त्यावर वेगवेगळे हावभाव करत ती आपली कला सादर करते. तिचे हावभाव, तिचे हातवारे या गोष्टी युजर्सना चांगल्याच आवडल्या आहेत. त्यामुळेच अनेकदा हा व्हिडिओ पाहिला जात आहे. साडी नेसून गळ्यात हेडफोन अडकवलेली ही महिला आपल्या रीलमुळे अनेकांना आकर्षित करत असून तिचा हा व्हिडिओ जोरदार फॉर्वर्ड केला जात आहे. 

अधिक वाचा - Shocking! या गावात ३० वर्षांपासून पुरुषांना नो एन्ट्री, तरी गावातील महिला होतायत गरोदर, काय आहे रहस्य?

व्हिडिओ होतोय व्हायरल

इंटरनेटवर एखादी गोष्ट ट्रेंडिंग झाली की त्यानंतर काही दिवस ती जोरदार व्हायरल होत राहते. सध्या हा व्हिडिओ अशीच कमाल करत आहे. गेल्या काही दिवसांत हा व्हिडिओ लाखो जणांनी पाहिला असून लोक तो इतरांनाही फॉर्वड करत आहेत. त्यामुळेच एका रात्रीत ही महिला भारतात प्रसिद्ध झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी