Indian Railways Free Food Policy: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) म्हणजे IRCTC ने रेल्वे प्रवाशांना एक मोठी भेट दिली आहे. भारतीय रेल्वे ट्रेनमध्ये प्रवाशांना मोफत जेवणाची सुविधा देत आहे. आता भारतीय रेल्वे प्रीमियम ट्रेनमध्ये मोफत जेवणाची सुविधा देणार आहे. आता तुम्हाला ट्रेनमध्ये जेवणासाठी कोणतेही शुल्क मोजावे लागणार नाही. मात्र, ट्रेन उशिराने आली तरच प्रवाशांना ही सुविधा दिली जाईल, हेही तेवढेच खरे आहे. आयआरसीटीसी स्वतः त्याचे शुल्क भरणार आहे, अनेकदा, ट्रेन उशिरा आल्यावर प्रवाशांना जेवणाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला आहे.
यामध्ये प्रवाशांना वेळेनुसार नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण दिले जाईल त्याचबरोबर त्यांना वायफाय सुविधाही देत आहेत. आता प्रवाशांना वेळेनुसार कोणताही पर्याय निवडता येणार आहे. यासोबतच शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही पर्याय असतील. आता ट्रेन लेट झाल्यास निराश होण्याची आणि जेवणाची चिंता करण्याची गरज नाही.
अधिक वाचा: Indian Railway: देशातील 'निनावी' रेल्वे स्टेशन... प्रवाशांचा उडतो गोंधळ
येथे तुम्हाला खाद्यपदार्थांसह शीतपेय आणि आइस्क्रीम मोफत मिळेल. ट्रेन लेट झाल्यास प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार नाही. विशेष म्हणजे येथे शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा पर्याय उपलब्ध असेल. यासाठी तुम्हाला एक रुपयाही शुल्क भरावे लागणार नाही.
ट्रेनला 2 तास किंवा त्यापेक्षा जास्त उशीर झाल्यास IRCTC प्रवाशांच्या जेवणाची काळजी घेईल. त्याच वेळी भारतीय रेल्वेने बहुतेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या विश्रांतीची व्यवस्था केली आहे. जिथे तुम्ही रूम बुक करू शकता आणि ट्रेन लेट झाल्यावर आराम करू शकता.
या सुविधा फक्त दुरांतो, राजधानी, शताब्दी सारख्या लांब पल्ल्याच्या प्रीमियम ट्रेनसाठी लागू करण्यात आल्या आहेत. यापैकी कोणतीही ट्रेन वेळेवर पोहोचली नाही तर प्रवाशांना मोफत जेवण दिले जाईल. मात्र, या गाड्या उशिरा येण्याची शक्यता फारच कमी आहे.
अधिक वाचा:भारतातील एका स्टेशनचं नाव आहे मस्जिद, काय आहे या नावामागील स्टोरी
येथे प्रवाशांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण वेळेवर दिले जाईल. IRCTC नाश्त्यात चहा, कॉफी, ब्रेड पकोडा आणि कोल्ड्रिंक ऑफर करते, तर दुपारच्या जेवणासाठी तुम्ही शाकाहारी किंवा मांसाहारी पर्याय निवडू शकता. त्याचप्रमाणे रात्रीच्या जेवणासाठी शाकाहारी आणि मांसाहारी पर्याय उपलब्ध आहेत.