गुगल का चुकते आहे, साराला केली शुभमनची पत्नी तर अनुष्काला राशीद खानची

व्हायरल झालं जी
Updated Oct 15, 2020 | 17:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Google search: गुगल सर्चवर गेल्या काही दिवसांपासून वेगळेच रिझल्ट दाखवले जात आहेत. त्यावरून गुगलची खिल्ली उडवली जात आहे.

sara and gill
सारा तेंडुलकर शुभमन गिलची पत्नी? पाहा गुगल काय सांगतय... 

थोडं पण कामाचं

  • गुगलवर योग्य उत्तरासाठी विश्वास ठेवला पाहिजे का?
  • गुगलने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला अफगाणिस्तानचा क्रिकेटर रशीद खानची पत्नी सांगितले होते
  • तुम्ही जर गुगलला ज्ञानी समजत असाल तर ते चुकीचे ठरेल.

मुंबई: गुगल(google) वर सध्या सर्च केल्यास वेगळेच काहीतरी दाखवले जात आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स(kolkata knight riders) म्हणजेच केकेआरविरुद्ध खेळणाऱ्या शुभमन गिलने(shubhman gill) गेल्याच महिन्यात २१ वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन केले होते. आता गुगलने त्याचे लग्नही लावले. तेही मास्टर ब्लास्टरची मुलगी सारा तेंडुलकरशी(sara tendulkar). हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. 

गेल्या आठवड्यात गुगलने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला अफगाणिस्तानचा क्रिकेटर रशीद खानची पत्नी सांगितले होते. लोकांनी यावरून गुगलची चांगलीच खिल्ली उडवली होती. गुगल सर्च खरंच भरकटले आहे का? का चुकीचे उत्तर देत आहे. गुगलवर योग्य उत्तरासाठी विश्वास ठेवला पाहिजे का? जाणून घेऊया याची उत्तरे

का चुकीची उत्तरे देतोय गुगल?

सगळ्यात आधी हे समजून घ्यावे लागेल की गुगलला उत्तर देण्यासाठी कोणतीही सिस्टीम नाही. एसई एक्सपर्ट आलोक रघुवंशी म्हणतात गुगल स्वत: कोणत्याही प्रश्नाची उत्तरे देत नाही. ते आर्टिफिशियल इंटीलिजे्स आणि मशीन लर्निंगसारखे टूल्सचा वापर करतो. बेस्ट उत्तर देणारे वेबपेज आपल्या समोर आणतो. त्यामुळे तुम्ही जर गुगलला ज्ञानी समजत असाल तर ते चुकीचे ठरेल. गुगल तुम्हाला केवळ पाण्याच्या विहीरीकडे नेऊन पोहोचवेल. मात्र ते पाणी प्यावे की नाही हे तुम्ही ठरवावे. 

कोणत्याही माहितीसाठी गुगलवर विश्वास ठेवता येतो का?

गुगलवर विश्वास ठेवावा की नाही. गुगल तर कोणतेच उत्तर देत नाही. तो केवळ तुम्ही विचारलेल्या प्रश्नाशी संबधित वेबपेज तुमच्यासमोर ठेवतो. त्यामुळे त्या वेबपेजवर किती विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर आहे. उदाहरणार्थ, विकीपिडीयाचे रिझल्टस सगळ्यात आधी समोर येतात.मात्र हा पूर्णपणे कम्युनिटी बेस प्लॅटफॉर्म आहे. हा कंटेट कोणीही एडिट करू शकतो. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा की नाही हे युझरने ठरवावे. 

गुगल प्रत्येकवेळेस १०० टक्के संबंधित रिझल्ट का देऊ शकत नही

कोणत्याही गोष्टीसाठी संबंधित सर्च करणाऱ्या व्यक्तीची आवड, त्याचे लोकेशन आणि टायमिंगवर डिपेंड असतो. कॉफी सर्च केल्यास तुम्हाला स्टारबक्स सगळ्यात संबंधित सर्च दाखवेल. तसेच भाषेचाही अनेकदा सर्च काय करतो यावर परिणाम होतो. 

सारा आणि अनुष्काच्या नावांवरून का झाली गफलत

गेल्या काही दिवसांपूर्वी शुभमन गिलने कार खरेदी केली होती त्याचा फोटोत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. यावर सारा तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली होती. त्यावर क्रिकेटर हार्दिक पांड्याने शुभमन गिलची खिल्ली उडवली होती. यानंतर असे बोलले जात होत की शुभमन आणि सारा एकमेकांना डेट करत आहेत. ही बातमी गुगल सर्चमध्ये टॉपवर दाखवत होते. यात साराला शुभमन गिलची पत्नी सांगितले होते. याचप्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये रशीद खानने एका मुलाखतीत अनुष्का शर्मा, प्रीती झिंटा आपल्या आवडत्या अभिनेत्री असल्याचे सांगितले होते. याच मुलाखतीत त्याला लग्नावरूनही प्रश्न विचारण्यात आले होते. जेव्हा गुगल सर्चवर रशीद खानच्या पत्नीबाबत विचारण्यात आले तेव्हा गुगलने मुलाखतीती की वर्ड्स जोडून सांगितले की अनुष्का शर्मा. याचाच अर्थ दोनही प्रकरणात ही गफलत सर्च इंजीनच्या काम करण्याच्या पद्धतीवरून आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी