गजब कारभार ! गैरहजर राहून एका व्यक्तिने कमावले ४ कोटी, १५ वर्ष ऑफिसला मारली दांडी

तुम्हाला असा कोणी व्यक्ती मिळाला का ज्याने एकही दिवस काम न करता पूर्ण पगार घेतला असेल. किंवा असं ऑफिस जे काम न करुन घेता पूर्ण पगार देत असेल.

italian police accuse a hospital worker of getting paid for 15 years
गजब कारभार ! गैरहजर राहून एका व्यक्तिने कमावले ४ कोटी  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • पंधरा वर्ष न काम करता मिळाला पगार
  • एकाही व्यवस्थापकांना नाही केला तपास
  • पंधरा वर्षात व्यक्तीने कमावले ४ कोटी रुपये

नवी दिल्ली :  तुम्हाला असा कोणी  व्यक्ती मिळाला का ज्याने एकही दिवस काम न करता पूर्ण पगार घेतला असेल. किंवा असं ऑफिस जे काम न करुन घेता पूर्ण पगार देत असेल.  नाही ना पण इटलीमध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टी मिळतील,  काम न करता पैसा कमावणारा व्यक्ती आणि काम करुन न घेता पगार देणारं कार्यालय पण. साधरण पगार कमवायचा म्हटलं तर तुम्हाला काम करावं लागतं.  महिनाभर ऑफिसला जावं लागतं, पण इटलीमधील एका व्यक्तीने तब्बल पंधरा वर्षात एकदाही ऑफिसला न जाता प्रत्येक महिन्याला पूर्ण पगार  मिळवला आहे.  आहे ना गंमत,  काय आहे प्रकरण हे आपण जाणून घेऊ...

 जाणून घ्या काय आहे हे प्रकरण....

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती एका हॉस्पीटलमध्ये कामाला आहे. पंधरा वर्ष न काम करता वेतन घेतल्याने या व्यक्तीवर फसवणूक, खंडणी, आणि कार्यालयाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासह या आरोपी व्यक्तीबरोबर सहा व्यवस्थापकांवरही कारवाई करण्यात आली आहे. कारण संबंधीत व्यक्ती गैरहजर असतानाही कोणतीच कारवाई केली नाही. दरम्यान न काम करता पैसा कमावणाऱ्या व्यक्तीचं वय ६७ वर्ष असून त्याने १५ वर्षात ५ लाख ३८ हजार युरो म्हणजे ४ कोटी रुपये कमावले आहेत. 

कसं बाहेर आलं हे प्रकरण

स्थानिक माध्यमांनुसार आरोपी व्यक्तीने एका व्यवस्थापकाला धमकी दिली होती, कारण हा व्यवस्थापक आरोपी व्यक्तीच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार होता. हे सर्व प्रकरण एका पोलीस तपासत समोर आले आहे. त्यानंतर व्यवस्थापक निवृत्त झाला, त्यानंतर आरोपी व्यक्ती गैरहजर राहू लागला. जेव्हा पोलीस एक दुसरं गैरहजेरीचं प्रकरण विषयी तपास करत होते तेव्हा हा प्रकार समोर आला.

पोलिसांकडून आता होतोय बारीक तपास 

पोलिसांनी सांगितले की, एचआर डिपार्टमेंट आणि नवीन व्यवस्थापकाला या प्रकरणाची जराही भनक नव्हती. पोलिसांच्या मते, कार्यालयातील कोणत्याच व्यक्ती हा प्रयत्न केला नाही की हा व्यक्ती का गैरहजर राहत आहे. उलट त्या व्यक्तीला दर दर महिन्याला वेतन मिळत होतं.  या प्रकरणात हॉस्पीटलमधील काही मोठ्या अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान पोलीस प्रत्येक बाजूचा तपास करत आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी