आलिशान घर खरेदी करा केवळ ७७ रूपयांत

व्हायरल झालं जी
Updated May 08, 2019 | 13:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

स्वतःच घर खरेदी करणं हे सर्वांचच स्वप्न असतं. असा एक देश आहे की, ज्या देशात केवळ ७७ रूपये घराची किंमत आहे. पण त्यामागचं कारण देखील काय आहे हे जाणून घ्या.

house selling
आलिशान घर खरेदी करा केवळ ७७ रूपयांत  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: आपलं स्वतःच एक आलिशान घर असावं हे सर्वांचचं स्वप्न असते. त्यातच आजच्या महागाईच्या दिवसात बऱ्याच लोकांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. स्वतःचा घर खरेदी करायचे असेल तर आर्थिक रूपात खूप मजबूत असणं महत्त्वाचं आहे. एखाद्याला जेव्हा एक ते दोन पगार असेल तरच त्याला एक आलिशान घर घेणं परवडू शकेल. पण असं तुमचं स्वप्न असातानाच कोणी सांगितलं की, एका ठिकाणी ७५ ते ८० रूपयांत घर मिळत असेल ? तर तुमची प्रतिक्रिया काय असेल ? कदाचिक तुम्हांला मस्करी सुद्धा वाटेल. पण खरं तर ही मस्करी नाही आहे, हे खरं आहे. पण जाणून घ्या नेमकं काय आहे हे वृत्त. 

इटलीतल्या सिसिलीच्या गई गावात एक यूरो (जवळपास ७७ रूपये) किंमतीत घरांची विक्री होतं आहे. जवळपास ४०० घरांची विक्री केली जात आहे. धक्कादायक म्हणजे, इतकी कमी आणि आकर्षक किंमत असताना ही लोकं घर खरेदी करण्यासाठी आकर्षित होत नाही आहेत. विशेष म्हणजे इतकी कमी किंमतीत घर विकण्यामागे नेमकं काय रहस्य आहे. 

दरम्यान ज्या जागांवर या घरांची विक्री केली जात आहे. तो परिसर भीतीदायक आहे. या जागांवर नैसर्गिक आपत्ती सारख्या घटना घडत असतात. याव्यतिरिक्त या भागात रोजगाराची देखील काही सुविधा नाही आहे. येथे मोठ्या संख्येनं घरं रिकामी आहेत. याच कारणानं कमी किंमत दाखवून ग्राहकांना घर खरेदी करण्यासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

यातली काही घरं १९ व्या शतकातली आहेत. या घरांचं बांधकाम देखील खूप जुनं आहे. या गावातून मोठ्या संख्येनं लोकं दुसऱ्या गावात आणि शहरात स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून हे गाव रिकामी आहे. या भागातील महापौर ग्राहकांना आमिष दाखवण्याचा देखील प्रयत्न करत आहेत. तरी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो कोणी हे घरं खरेदी करेल त्याला १० लाखांहून अधिक पैसे घर दुरूस्त करण्यासाठी लागतील. मात्र हे घर दुरूस्त केल्यास या घरांच्या किंमतीत ३०० टक्क्यांनी वाढ होईल. त्यामुळे सध्या तरी इटलीच्या या भागात असलेले कमी किंमतीतलं घरं कोणी खरेदी करणार हाच प्रश्न आहे.

त्यात आता पावसाळ्याचे दिवस येत आहेत. त्यात नैसर्गिक आपत्ती असलेल्या या गावात सध्या तरी घर खरेदी करणार नाही हेच दिसतंय. या गोष्टीमुळे एक लक्षात ठेवा, जरी घराच्या किंमती कमी असल्यातरी घराचं ठिकाण जागा काय आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
आलिशान घर खरेदी करा केवळ ७७ रूपयांत Description: स्वतःच घर खरेदी करणं हे सर्वांचच स्वप्न असतं. असा एक देश आहे की, ज्या देशात केवळ ७७ रूपये घराची किंमत आहे. पण त्यामागचं कारण देखील काय आहे हे जाणून घ्या.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola