[VIDEO] झोपणाऱ्या सिंहाशी केली अशी मस्करी,  खोडकर कोल्हाच्या हिम्मतीला सर्व देताहेत दाद 

Naughty Jackal prank with Lion :  झोपलेल्या सिंहासोबत एका कोल्ह्याने प्रँक करण्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. लोक या कोल्ह्याच्या हिम्मतीला दाद देत आहेत. 

jackal naughty prank with a sleeping lion watch viral video in marathi tvirl 54
[VIDEO] झोपणाऱ्या सिंहाशी केली अशी मस्करी,  खोडकर कोल्हाच्या हिम्मतीला सर्व देताहेत दाद  

नवी दिल्ली :  इंटरनेटर नेहमी प्रँक व्हिडिओ व्हायरल होत असतात, असे व्हिडिओ लोकांच्या चेहऱ्यावर आपसूक हसू आणतात. अनेक वेळा हसून हसून पुरेवाट लागते. आतापर्यंत मनुष्यांचे प्रँक व्हिडिओ सामान्य गोष्ट झाली आहे. पण जंगली जनावरांचे प्रँकही आता व्हायरल होत आहे. नुकताच जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, असा प्रँक व्हिडिओ फार कमी पाहायला मिळतो. भारतीय वन सेवा अधिकारी रमेश पांडे यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये एक कोल्हा झोपलेल्या सिंहाची खोडी काढताना दिसत आहे. 

 

 

८ सेकंद लांब या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण पाहू शकतो की सिंह झुडपांमध्ये झोपला आहे. या दरम्यान, एक कोल्हा हळूच सिंहाकडे पोहचतो. कोल्हा सिंहाचे शेपटीचा चावा घेतो आणि काही कळण्याचा आता तेथून पळ काढतो. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर सिंह झोपेतून खडबडून जागा होता. पण तो पर्यंत कोल्हा त्याच्यापासून दूर पळालेला असतो. त्यामुळे तो फक्त त्याला पाहतच राहतो. 

 

 

 

 

व्हिडिओला कॅप्शन देताना आयएफएस रमेश पांडे यांनी लिहिले की, आकार किंवा शक्तीमुळे कोणाला कमी समजू नका. जनावरांमध्येही मस्करी आणि हास्य भावना असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी