जयपूर: राजस्थानच्या (Rajasthan) जयपूर (Jaipur) नगर निगमच्या (ग्रेटर) महापौर सौम्या गुर्जर (Somya Gurjar) यांनी महिलांसमोर एक आदर्श (example) ठेवला आहे. त्या दुसऱ्यांदा आई (motherhood) झाल्या आहेत आणि याची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरवरून (Twitter) दिली आहे. त्यांची चर्चा होण्याचे कारण असे की आपल्या प्रसूतीच्या (delivery) आठ तास आधीपर्यंत त्या काम (work) करत होत्या आणि यादरम्यान त्यांनी ग्रेटर निगम अधिकाऱ्यांसोबतही बैठकही (meeting) केली. यादरम्यान त्यांना प्रसववेदना (labor pains) होत होत्या याची कल्पनाही त्यांनी कुणाला येऊ दिली नाही.
डॉ. सौम्या यांनी गुरुवार सकाळी 5.14 वाजता बाळाला जन्म देण्याआधी बुधवारी रात्री उशिरापर्यंत काम केले आणि काम हीच पूजा असल्याचे सिद्ध केले. यानंतर गुरुवारी सकाळी ट्विट करत त्यांनी लिहिले, 'काम हीच पूजा आहे! रात्री उशिरापर्यंत कार्यालयात बैठक घेतली, प्रसववेदना चालू झाल्यावर रात्री 12:30 वाजता कुकून रुग्णालयात भरती झाले आणि पहाटे 5.14 वाजता परमपिता परमेश्वराच्या कृपेने मुलाला जन्म दिला. मी आणि बाळ दोघेही बरे आहोत.'
डॉ. सौम्या यांनी सांगितले की, त्या आईसोबतच महापौराची भूमिकाही आधीसारखीच पार पाडतील. त्यांनी सांगितले जर सर्वकाही ठीक राहिले तर त्या सोमवारपासून घरातून फाईल्स पाहायला सुरुवात करतील आणि दहा दिवसांनंतर म्हणजे 22 फेब्रुवारीपासून बाळासह ऑफिसला जातील. त्यांची ही स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत. सौम्या यांना एक मोठी मुलगी आहे.
डॉ. सौम्या गुर्जर यांचे ट्विट व्हायरल होत आहे, अनेक लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत आणि त्यांच्या कामाबद्दलच्या निष्ठेचे कौतुक करत आहेत. आत्तापर्यंत त्यांच्या या ट्विटला 11 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत आणि 810पेक्षा जास्त रिट्विट्स झाले आहेत. अडीच हजार लोकांनी यावर कॉमेंट्स केल्या आहेत. याआधी इंदौर नगर निगमच्या आयुक्त प्रतिभा पाल यांनीही असाच आदर्श ठेवला होता आणि 12 जानेवारी रोजी बाळाला जन्म देण्याआधी 12 तासांपर्यंत त्या काम करत होत्या.