Special Wedding in Jalgaon । जळगाव : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. कोण कोणाशी लग्न करेल हे ठरलेले असते अशी मान्यता आहे. एखादा जोडीदार प्रत्येकासाठी बनवू ठेवलेला असतो. मग परिस्थिती किती प्रतिकूल असो. याचाच प्रत्यय जळगावात आला. या लग्नात वर संदीप सपकाळे हा ३६ इंच उंचीचा तर वधू उज्ज्वला ही ३१ इंच उंचीची आहे. या नवदांपत्यासोबत अनेकांना सेल्फी काढण्याचा मोहदेखील आवरता आला नाही. त्यामुळे जळगावात या लग्नाची चर्चा चांगलीच रंगत आहे.पाहूयात या अनोख्या लग्न सोहळ्याची कहाणी.. (Jalgaon's 36-inch-tall Sandeep got married to a 31-inch-tall Ujjwala)
शनिपेठेतील चौगुले प्लॉट परिसरातील वर संदीप संजय सपकाळे हा शिक्षित असून, तो शहरातील एका नामांकित सुवर्णपेढीत कामाला आहे. तर वधू ही धुळ्याची आहे. या लग्नाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे या वधू आणि वराची उंची. ३६ इंच उंची असलेल्या संदीपला त्याची आयुष्याची साथीदार म्हणून ३१ इंची उज्ज्वला मिळाली आहे. सर्वसाधारण उंची असलेल्यांना देखील अनुरूप मुलगी वा मुलगा मिळणे अवघड जाते.
त्यात कमी उंचीच्या वराला वा वधूला आपल्या उंचीच्या अनुरूप जोडीदार मिळणे अधिक अवघड असते; मात्र संदीप आणि उज्ज्वला दोघेही एकमेकांना अनुरूप आहे. मुलगा संदीप याची उंची कमी असल्याने आम्ही अनेक वर्षांपासून गावोगावी फिरून मुलगी बघत होतो. मात्र उंची कमी असल्याने त्याला मुलगी द्यायला कोणीच तयार होत नव्हते. मात्र शेवटी धुळे येथील त्याच्याच उंचीची मुलगी माझ्या मुलाला मिळाल्याने तिला मी माझ्या पोटच्या मुलीसारखी वागविणार असल्याची प्रतिक्रिया संदीपच्या आईने व्यक्त केली.