Kashmir School Girl Viral Video: जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील जीर्ण झालेल्या शाळेची व्यथा मांडणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या फेसबुक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सीरत नाज नावाची एक चिमुरडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक चांगली शाळा बनवण्याचे हृदयस्पर्शी आवाहन करताना दिसत आहे. (jammu and kashmir kathua school girl video viral says please modiji)
अधिक वाचा : Viral Video: वडिलांच्या वयाच्या प्रियकरासोबत स्कूटी गर्लचा रोमान्स, पाहा व्हिडीओ...
सीरत नाझ या तरुण विद्यार्थिनीने तिच्या व्हिडिओमध्ये शाळेची इमारत आणि मजला, शौचालय, जिने, शिक्षक आणि मुख्याध्यापक कार्यालय इत्यादींची जीर्ण अवस्था दाखवली आहे.
अधिक वाचा : AI Viral Images: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींना AI आर्टिस्टने बनवलं गरीब, पाहा PHOTOS
फेसबुकवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसणारी विद्यार्थिनी जम्मू-काश्मीरच्या (J&K) कठुआ जिल्ह्यातील लोहाई-मल्हार गावची रहिवासी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गोड इच्छा व्यक्त करताना ती म्हणते - "कृपया मोदीजी, आमच्यासाठी एक चांगली शाळा बनवा."