सोशल मीडियात ट्रेंड होतोय #JCBKiKhudayi, अनेक मीम्स व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated May 29, 2019 | 12:13 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

सोशल मीडियातील ट्विटरवर सध्या एक हॅशटॅग खूपच ट्रेंड करत आहे आणि हा हॅशटॅग आहे #JCBKiKhudayi म्हणजेच जेसीबी की खुदाई. हा हॅशटॅग ट्रेंड होत असताना युजर्सने यावर अनेक मीम्स तयार केले आणि आत ते व्हायरलही होत आहेत.

jcbkikhudayi hashtag and memes viral in social media
सोशल मीडियात ट्रेंड होतोय #JCBKiKhudayi, अनेक मीम्स व्हायरल  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: सोशल मीडियात शेअर होणारे अनेक व्हिडिओज तुम्हाला हसवतात. सोशल मीडियात एखादा व्हिडिओ, फोटो शेअर केला तर तो तात्काळ व्हायरल ही होतो. आता सध्या सोशल मीडियातील ट्विटरवर एक हॅशटॅग ट्रेंड होत आहे जो पाहून तुम्हालाही हसू येईल. होय आणि हा हॅशटॅग आहे 'जेसीबी की खुदाई' (#JCBKiKhudai). जेसीबी मशीन ही जमीन खोदण्यासाठी वापरतात मात्र, आता सध्या हिच जेसीबी मशीन सोशल मीडियात ट्रेंड होत आहे आणि त्याचं कारण म्हणजे त्यावर तयार करण्यात आलेले मीम्स. सोमनारी सायंकाळी ट्विटरवर हॅशटॅग जेसीबी की खुदाई (#JCBKiKhudai) ट्रेंड होत आहे.

जे सी बामफोर्ड एक्सावेटर्स लिमिटेडला शॉर्ट फॉर्म म्हणून जेसीबी संबोधलं जातं. जे सी बामफोर्ड एक्सावेटर्स लिमिडेट कंपनी बांधकाम क्षेत्रात उपयोगी उपकरणांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या सोशल मीडियात जेसीबी खड्डा खोदतानाचे फोटोज सोशल मीडियात ट्रेंड करताना दिसत आहे. इतकंच नाही तर युजर्सने याचे मीम्स सुद्धा शेअर केले आहेत. एका ट्विटर युजर्ने जेसीबी खड्डा खोदत असताना आजुबाजुला किती लोकं उभे राहतात याचा एक व्हिडिओ शेअर केला. त्याने जेसीबीचा स्क्रीनशॉट शेअर करताना ट्विट करत लिहिलं की, 'जेसीबी खड्डा खोदतानाचे जोक्स खूपच मजेदार आहेत. जेसीबी खड्डा खोदत असल्याचे युट्यूबवरील व्हिडिओ पाहण्यासाठी अनेक बेरोजगार आहेत. या व्हिडिओजला लाखों हिट्स सुद्धा मिळत आहेत'.

इंटरनेट युजर्सला हा हॅशटॅग आणि पोस्ट खूपच आवडत आहे. तसेच या पोस्ट सध्या सोशल मीडियात मोठ्या वेगाने व्हायरल सुद्धा होत आहेत. अनेक युजर्स हॅशटॅग वापरुन त्यासंदर्भातील मीम्स सुद्धा शेअर करत आहेत. तर काहींनी #JCBKiKhudayi या हॅशटॅगमागील रहस्य उलगडण्यासाठी ट्विटर युजर्सचे आभार मानले आहेत.

इतकंच नाही तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी हिने सुद्धा आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सनी लिओनी जेसीबी मशिनवर उभी असल्याचं पहायला मिळत आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सोशल मीडियात ट्रेंड होतोय #JCBKiKhudayi, अनेक मीम्स व्हायरल Description: सोशल मीडियातील ट्विटरवर सध्या एक हॅशटॅग खूपच ट्रेंड करत आहे आणि हा हॅशटॅग आहे #JCBKiKhudayi म्हणजेच जेसीबी की खुदाई. हा हॅशटॅग ट्रेंड होत असताना युजर्सने यावर अनेक मीम्स तयार केले आणि आत ते व्हायरलही होत आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola