Weird Job Advertisement : केवळ आळशी आणि दुःखी लोकांसाठी नोकरीची संधी, अट फक्त एकच

आळशी आणि दुःखी लोकांना कुठलीही नोकरी करणं जड जातं. मात्र आता अशा लोकांसाठी एक नवी संधी चालून आली आहे.

Weird Job Advertisement
केवळ आळशी आणि दुःखी लोकांसाठी नोकरीची संधी  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • कंपनीला हवेत फक्त दुःखी आणि आळशी लोक
  • जाहीरात देऊन मागवले अर्ज
  • घातलीय फक्त एकच अट

Weird Job Advertisement | आपल्याला आरामाची नोकरी असावी, असं अनेकांना वाटतं. ज्यांच्याकडे ती नसते ते आहे त्या नोकरीत आराम शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला नोकरीतून जास्तीत जास्त पगार मिळावा आणि त्या बदल्यात आपल्याला कमीत कमी काम पडावं, अशीच बहुतांश चाकरमान्यांची अपेक्षा असते. त्यासाठी ते संधी मिळेल तेव्हा कामचुकारपणा करण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या खांद्यावरची जबाबदारी टाळण्याचा आणि कमीत कमी कष्टात काम करण्याचा ते प्रयत्न करत असतात. सरकारी नोकर तर कामचुकारपणासाठी बदनाम असतात. सगळेच सरकारी कर्मचारी कामचुकार नसतात. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल जर सामान्य लोकांचं मत पाहिलं, तर ते आळशी आणि कामचुकार असतात, अशाच प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. मात्र आता आळशी असण्याचेही फायदे होणार आहेत. 

आळशी लोकांसाठी नोकरी

सध्या सोशल मीडियावर नोकरीची एक जाहीरात जोरदार व्हायरल होत आहे. ही जाहीरात वाचून तुम्हाला आश्चर्य तर वाटेलच, मात्र त्यासोबत जोरदार धक्काही बसेल आणि हसूही येईल. या जाहीरातीत आळशी आणि दुःखी लोकांना जॉबसाठी ऑफर देण्यात आली आहे. 

आळशी आणि दुःखी

तुम्ही जर आळशी आणि दुःखी असाल, तर तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जाहीरातीत कंपनी म्हणते, आमच्याकडील बहुतांश कर्मचारी हे फक्त आळशीच नव्हे, तर दुःखीही आहेत. त्यामुळे नवे कर्मचारीही तसेच असतील, तर त्यांना जुन्या कर्मचाऱ्यांशी जुळवून घेणं सोपं जाईल. आळशी लोकांना या जॉबसाठी संधी आहेच, मात्र त्यात तुम्ही दुःखीही असाल तर ते वेगळे क्वालिफिकेशन समजलं जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी येताना आपापले सीव्ही घेऊन यावेत, असंही या जाहीरातीत म्हणण्यात आलं आहे. 

अंघोळ करून या

तुम्ही कितीही दुःखी असला किंवा किती आळशी असला तरी या नोकरीसाठी एक गोष्ट मात्र करावीच लागणार आहे. ती गोष्ट म्हणजे अंघोळ. प्रत्येकाने ऑफिसला येताना अंघोळ करून आलं पाहिजे, एवढी एकच अट या कर्मचाऱ्यांना कंपनीने घातली आहे. वास्तविक, आळशी आणि दुःखी लोकांसाठी रोजच्या रोज अंघोळ करणं, हेदेखील एक आव्हानच असू शकतं, याची कल्पना कंपनीला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना ही अट हास्यास्पद वाटत असली, तरी खऱ्या आळशी माणसासाठी ती खूप मोठी गोष्ट असल्याचा कंपनीचा दावा आहे. 

जाहीरात होतेय व्हायरल

अधिक वाचा - Optical Illusion: कोरड्या खडकात 3 घुबड लपलेले आहेत, १ टक्केच लोकांना दिसले, त्यात तुम्ही आहात का 

आपले कर्मचारी आनंदी आणि सक्रीय असावेत, अशीच कुठल्याही कंपनीची अपेक्षा असते. मात्र या कंपनीने दुःखी आणि आळशी असणं हीच पूर्वअट घातली असल्यामुळे या जाहीरातीची जाोरदार चर्चा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी