विमानात स्वार होताना तीनवेळा अडखळले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन, पाहा व्हायरल व्हिडिओ

व्हायरल झालं जी
Updated Mar 20, 2021 | 11:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात दिसत आहे की विमानात चढताना ते तीन वेळा अडखळले आहेत. पायऱ्या चढताना त्यांचा तोल गेल्याचे या क्लिपमध्ये दिसत आहे.

Joe Biden
विमानात स्वार होताना तीनवेळा अडखळले अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन, पाहा व्हायरल व्हिडिओ 

थोडं पण कामाचं

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • विमानाच्या पायऱ्या चढताना तीन वेळा घसरले जो बायडन
  • व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी सांगितले- राष्ट्राध्यक्ष 100 टक्के तंदुरुस्त बायडेन

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (American President) जो बायडेन (Joe Biden) शुक्रवारी एअरफोर्स वन (Air Force One) या विमानात (aircraft) चढताना पायऱ्या (steps) चढताना तीनवेळा घसरले. यादरम्यान त्यांना कोणतीही गंभीर दुखापत (serious injury) झालेली नाही. या घटनेचा एक व्हिडिओ (video) सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होत आहे ज्यात दिसत आहे की एअरफोर्स वनमध्ये चढताना बायडेन पायऱ्यांवरून घसरले. व्हाईट हाऊसने (White House) याबाबत म्हटले आहे की राष्ट्राध्यक्ष 100 टक्के तंदुरुस्त आहेत.

बायडेन यांचा व्हिडिओ व्हायरल

बायडेन या विमानातून अटलांटासाठी रवाना होत होते जिथे या आठवड्याच्या सुरुवातीला सामूहिक गोळीबार झाला आणि याचबाबत आशिया-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांशी भेटीचा त्यांचा कार्यक्रम होता. व्हिडिओत दिसत आहे की राष्ट्राध्यक्ष बायडेन पायऱ्या चढताना बाजूच्या रेलिंगचा आधार घेत आहेत कारण इथे जोरदार वाराही आहे. हळूहळू ते पूर्ण पायऱ्या चढतात आणि मागे वळून सॅल्यूट करतात. 78 वर्षीय बायडेन नुकतेच अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.

गेल्यावर्षी झाले होते हेअरलाईन फ्रॅक्चर

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी हे स्पष्ट केलेले नाही की या घटनेनंतर बायडेन यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे की नाही. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जेव्हा बायडेन आपल्या पाळीव कुत्र्याशी खेळत होते तेव्हा त्यांच्या पायाला हेअरलाईन क्रॅक केला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तत्कालीन विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केल्यानंतर बायडेन यांनी जगातील सर्वात ताकदवान देशाची कमान आपल्या हाती घेतली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी