Judge Caught Kissing Prisoner: कैद्याची शिक्षा कमी करायला गेली अन् त्याचा Kiss घेऊन आली, पहा व्हिडिओ

Judge Caught Kissing Prisoner: न्यायाधीश (Judge) म्हटलं म्हणजे सर्वोच्च पातळवरील व्यक्ती. चुकी करणाऱ्याला किंवा गुन्हा (Crime) करणाऱ्याला शिक्षा (sentence) करण्याचा अधिकार न्यायाधीशाला असतो. परंतु चुकीचे काम करताना न्यायाधीशच सापडत असेल तर दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न सहज पडतो.

Judge Caught Kissing Prisoner
कैद्याच्या शिक्षेविषयी बोलयला गेली अन् किस घेऊन आली  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • अर्जेंटिनामध्ये महिला न्यायाधीश कैद्याचे चुंबन घेताना पकडले गेली
  • हा कैदी देशाच्या दक्षिणेकडील चुबुत प्रांतात एका पोलिस कर्मचाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी दोषी आढळला होता.
  • ही तीच महिला न्यायाधीश आहे जिने आठवड्याभरापूर्वी कैद्याची शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला होता.

Argentinian Judge Caught Kissing Prisoner: अर्जेंटिना : न्यायाधीश (Judge) म्हटलं म्हणजे सर्वोच्च पातळवरील व्यक्ती. चुकी करणाऱ्याला किंवा गुन्हा (Crime) करणाऱ्याला शिक्षा (sentence) करण्याचा अधिकार न्यायाधीशाला असतो. परंतु चुकीचे काम करताना न्यायाधीशच सापडत असेल तर दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न सहज पडतो. अर्जेंटिना (Argentina) या लॅटिन अमेरिकन (Latin American) देशामध्ये अशीच एक घटना घडली आहे. येथील एक महिला न्यायाधीशाला एका कैद्याशी चुंबन (Kissing) करताना पकडण्यात आले आहे. 

2009 मध्ये चुबुत प्रांतातील एका पोलीस शिपाई लिओनार्डो टिटो रॉबर्ट्सची हत्या केल्या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात सहभागी असल्याने या व्यक्तीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या कैद्याची शिक्षा कमी करण्यासाठी गेलेल्या महिला न्यायाधीशाने आपलं भान हरपत जमिनीवर बसलेल्या कैद्याला चुंबन किस घेतलं. दरम्यान या महिला न्यायाधीशाचे नाव मारिएल सुआरेझ असून ही तीच आहे जिने कैदी ख्रिश्चन 'मे' बौस्टोसची जन्मठेपेची शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला होता. 

मेरिएलला 29 डिसेंबर रोजी तुरुंगात एका कैद्याचे चुंबन घेताना पकडण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. डेली मेलच्या अहवालानुसार, 2009 मध्ये पोलीस शिपाई लिओनार्डो टिटो रॉबर्ट्सच्या हत्येसाठी कैदी बौस्टोसला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याच्या निर्णयावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या टीमचा मेरीएल भाग होती.

न्यायाधीशांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू 

बौस्टोसला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याच्या निर्णयाविरुद्ध मत देणाऱ्या  न्यायाधीशांमध्ये मारिएल ही एकमेव न्यायाधीश होती. तेही जेव्हा त्यांना सांगण्यात आले की, बूस्टोस हा अतिशय धोकादायक कैदी आहे. दरम्यान, बोस्टसला वाचवण्याचा मेरीएलचा प्रयत्न व्यर्थ झाला आणि आता त्याला  जन्मठेपेची शिक्षा झाली. ही शिक्षा आता गेल्या आठवड्यातच सुरू झाली आहे. तर दुसरीकडे, मेरीएलने आता या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

मारिएल म्हणाली, '  मी या प्रकरणावर एक पुस्तक लिहित आहे म्हणून मी कैद्याला भेटायला गेले. मी त्याला पहिल्यांदाच पाहिले आणि आम्ही शिक्षेबद्दल बोललो. मी त्याची मुलाखत घेणार असल्याचं त्याला सांगितलं होतं. त्यादरम्यान माझी आणि त्याची टक्कर झाली होती. दरम्यान कैद्यासोबत आपले कोणतेही भावनिक नाते नसल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, चुबुत प्रांतातील अधिकार्‍यांनी महिला न्यायाधीशांविरुद्ध कथित अन्यायकारक वागणुकीबद्दल शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी