Jugaad Video: पाकिस्तानींचा जुगाड पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, पहा बाईकची कशी झाली 'टॅक्सी' 

Pakistani Funny Jugaad Video: तुम्ही जुगाडचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. आजकाल हे 'तंत्रज्ञान' मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. जुगाडचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण, पाकिस्तानींचा जुगाड पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. 

jugaad video pakistani bike jugaad video share on social media
पहा बाईकची कशी झाली 'टॅक्सी'  

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानी लोकांचा अप्रतिम जुगाड
  • बाईकला बनवली  'टॅक्सी'
  • 'व्हिडिओ पाहिल्यानंतर हसू आवरता येणार नाही'

Pakistani Funny Jugaad Video: शेजारी देश पाकिस्तान अनेकदा विचित्र कारनाम्यांमुळे चर्चेत असतो. अनेक वेळा तिथले लोक अशी कृत्ये करतात, ज्यामुळे पाकिस्तानची खिल्ली उडवली जाते. एवढेच नाही तर कधी कधी राजकारणी सुद्धा पाकिस्तानची चेष्टा करतात. याच मालिकेमध्ये पाकिस्तानचा असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, जो पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरता येणार नाही. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, 'हे फक्त पाकिस्तानमध्येच होऊ शकते'. (jugaad video pakistani bike jugaad video share on social media)

जुगाडचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. आजकाल हे 'तंत्रज्ञान' मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. जुगाडचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण, पाकिस्तानींचा जुगाड पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल.  व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बाईकचे 'टॅक्सी' मध्ये रूपांतर कसे केले गेले आहे. ज्यावर सहा जण आरामात बसले आहेत. जुगाड वापरुन, बाईक शिडीला जोडली गेली आहे आणि मागील बाजूस दोन टायर लावण्यात आले आहेत. ज्यावर एकूण सहा लोक आरामात बसले आहेत. जेव्हा ही 'टॅक्सी' रस्त्यावर आली तेव्हा सगळे बघत राहिले. व्हिडिओ पहा ...


पाकिस्तानी लोकांचा अप्रतिम जुगाड ..

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्याने हा व्हिडिओ पाहिला तो खूप हसत आहे.  लोकांना हा व्हिडिओ आवडत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर 'SJSvasan' नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. तर तुम्हाला पाकिस्तानी लोकांचा हा जुगाड कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी