किंग कोब्राची टूर टूर, आठवड्यानंतर कोब्राची घरवापसी

Jungle News In Marathi King Cobra Escapes From Zoo Return After One Week In Terrarium : काही वेळा अशा घटना घडतात ज्या समजल्यावर भले भले चक्रावून जातात. अशीच एक घटना स्वीडनमध्ये घडली.

King Cobra Escapes From Zoo Return After One Week In Terrarium
किंग कोब्राची टूर टूर, आठवड्यानंतर कोब्राची घरवापसी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • किंग कोब्राची टूर टूर, आठवड्यानंतर कोब्राची घरवापसी
  • विषारी असलेला 2.2 मीटर लांबीचा किंग कोब्रा
  • प्राणीसंग्रहालयाच्या सीईओने दिली माहिती

Jungle News In Marathi King Cobra Escapes From Zoo Return After One Week In Terrarium : काही वेळा अशा घटना घडतात ज्या समजल्यावर भले भले चक्रावून जातात. अशीच एक घटना स्वीडनमध्ये घडली. स्वीडनच्या एका प्राणीसंग्रहालयातून सहल करण्यासाठी किंग कोब्रा साप गुपचूप बाहेर पडला. तब्बल एक आठवड्यानंतर या किंग कोब्राची घरवापसी झाली. 

विषारी असलेला 2.2 मीटर लांबीचा सर वास किंवा हौदिनी किंवा सर हिस या नावांनी ओळखला जाणारा किंग कोब्रा साप स्वीडनच्या प्राणीसंग्रहालयातून बाहेर पडला. सरपटत प्राणीसंग्रहालयातून बाहेर गेलेला किंग कोब्रा तब्बल एक आठवड्यानंतर सरपटत पुन्हा प्राणीसंग्रहालयात परतला. स्कॅन्सन अॅक्वेरियमचे सीईओ जोनास वाह्लस्ट्रॉम यांनी स्वीडिश पब्लिक ब्रॉडकास्टर एसटीव्हीला ही माहिती दिली. 

प्राणी संग्रहालयात किंग कोब्राला ज्या काचेच्या बंदीस्त खोलीत ठेवले होते त्या खोलीच्या छतातून नैसर्गिक प्रकाश येण्याची व्यवस्था होती. याच खोलीच्या छताजवळ एक फट निर्माण झाली होती. या छोट्या पण किंग कोब्रासाठी पुरेश्या असलेल्या मोकळ्या जागेतून साप प्राणी संग्रहालयातून बाहेर पडला होता. पण बाहेरचा अनुभव त्रासदायक वाटल्यामुळे सापाने घरवापसी केल्याची शक्यता प्राणीसंग्रहालयाच्या सीईओने व्यक्त केली. 

बंदीस्त खोलीतून बाहेर पडला तरी प्राणीसंग्रहालयाच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडण्याची हिंमत किंग कोब्रा दाखवू शकला नाही. स्वीडनमधील थंड वातावरणात गारठून किंग कोब्राचा मृत्यू होण्याची शक्यता होती. या वातावरणात जिवाला असलेला धोका ओळखून किंग कोब्रा प्राणीसंग्रहालयातून बाहेर पडला नव्हता. 

बंदीस्त खोलीतून बाहेर आलेला किंग कोब्रा प्राणी संग्रलयात होता पण भोवतालचे वातावरण आणखी जवळून बघून बहुधा घाबरला होता. याच कारणामुळे त्याने कोणावरही हल्ला केला नाही. सलग काही दिवस शांतपणे बंदीस्त खोलीबाहेर काढल्यानंतर किंग कोब्रा जसा बाहेर आला तसाच परत जागेवर परतला.

किंग कोब्रा सापाच्या छोटेखानी सहलीमुळे प्राणी संग्रहालयाचे अधिकारी आणि कर्मचारी धास्तावले होते. सुदैवाने कोणतीही वाईट घटना घडली नाही. किंग कोब्रा परतला. आता किंग कोब्रा बंदीस्त खोलीतच आहे. कोणताही प्राणी त्यांच्यासाठीच्या बंदीस्त आणि सुरक्षित अशा जागेतून बाहेर पडलेला नाही. आता प्राणी संग्रहालय पूर्णपणे सुरक्षित आहे. 

बंदीस्त खोलीबाहेर पडलेला किंग कोब्रा 2.2 मीटर लांबीचा साप होता. याच प्रजातीचे अनेक किंग कोब्रा साप 5.5 मीटर लांबीचे असतात. हे साप प्रामुख्याने भारतात आढळतात. या सापांचे विष अतिशय घातक असते. हे एक प्रकारचे न्युरोटॉक्सिन असते. किंग कोब्राने प्राण्याला किंवा माणसाला दंश केला तर विष शरीरात भिनते आणि थेट मेंदूच्या कार्यक्षमतेवर आघात करते. याच कारणामुळे किंग कोब्राच्या दंशामुळे लवकर मृत्यू होण्याची अथवा माणूस कोमात जाण्याची वा माणसाला पक्षाघाताचा (पॅरालिसिस) झटका येण्याची शक्यता असते.

Video: 'फायर स्टंट' करणं पडलं महागात, तोंडातून आग ओकताना भाजला चेहरा

Optical Illusion: करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी वाघ टप्प्यात येऊन बसलाय, पण तुम्हाला दिसतोय का?

घातक असलेल्या किंग कोब्रा सापाचे रक्त अतिशय थंड असते. याच कारणामुळे  थंडीच्या दिवसात किंग कोब्रा साप बिळात उबदार वातावरणात सुरक्षित राहणे पसंत करतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी