नुकताच पदवीधर झालेला ‘या’ नेत्याचा मुलगा दिसतो वडिलांसारखाच हँडसम, फोटो व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated May 20, 2019 | 20:41 IST | टाइम्स नाऊ हिंदी

राजकारणातील एक रॉयल कुटुंब म्हणजे सिंधिया यांचं कुटुंब. सध्या सोशल मीडियावर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शेअर केलेले फोटो खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमागे तसंच काहीसं कारण आहे. जाणून घ्या फोटो का होतोय व्हायरल

Jyotiraditya Scindia
ज्योतिरादित्य सिंधिया याचं कुटुंब  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: रॉयल सिंधिया कुटुंबातील सदस्य असलेले काँग्रेसचे नेते आणि खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रविवारी ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. हा फोटो बघता-बघता व्हायरल झालाय. हा फोटो आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या कुटुंबाचा. त्यांचा मुलगा नुकताच पदवीधर झालाय. अमेरिकेतील येल विद्यापीठातून ज्योतिरादित्य यांचा मुलगा महाआर्यमन सिंधिया हा पदवीधर झाला आहे. नुकताच त्याचा दीक्षांत समारंभ विद्यापीठात पार पडला. या सोहळ्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांची पत्नी उपस्थित होते.

सोहळ्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत लिहिलं, ‘एक वडील म्हणून मला आज खूप अभिमान वाटतोय. येल विद्यापीठातून माझ्या मुलानं आज ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवली आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे.’

 

 

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या या ट्विटवर नेहमीच काहीतरी बरळणाऱ्या कमाल खाननं कमेंट केलीय. पण यावेळी कमाल खान जरा चांगल्या शब्दात बोललाय. कमाल खाननं महाआर्यमनच्या भविष्याबद्दल त्याच्या वडिलांना एक सल्ला दिलाय. कमाल खाननं लिहिलं, ‘खूप खूप अभिनंदन! आपला मुलगा खूप हँडसम आहे आणि एखाद्या हिरोसारखा दिसतो. त्याला अभिनेता बनू द्या.’

 

 

कमाल खानचा सल्ला काहीही असो पण काही दिवसांपूर्वी महाआर्यमननं सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ पाहून वाटतंय की, त्याला राजकारण आवडतं. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मुलानं १० मे रोजी एक व्हिडिओ आपल्या ट्विटर पेजवर पोस्ट केला होता. यात त्यानं मध्यप्रदेशच्या जनतेला विशेष म्हणजे वडिलांच्या मतदारसंघातील जनतेला मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. आपण लोकसभा निवडणुकीदरम्यान तिथं उपस्थित नसल्याची त्यानं व्हिडिओद्वारे माफी सुद्धा मागितली होती.

 

 

जनतेसोबत संवाद साधणारा महाआर्यमनचा हा व्हिडिओ पाहून आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो राजकारणात प्रवेश करेल, याचे संकेत मिळतायेत.

सिंधिया हे ग्वालियरचं एक रॉयल कुटुंब आहे. त्यांच्या शाही परिवारातील अनेक सदस्य राजकारणात आहेत. स्वर्गीय माधवराव सिंधिया हे काँग्रेसचे मोठे नेते होते. तर त्यांची आई राजमाता विजयाराजे सिंधिया या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या होत्या. आपल्या आई प्रमाणेच राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया या भाजप नेत्या आहेत. मात्र माधवराव सिंधिया यांचा मुलगा ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेसचे तरुण खासदार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी