Kacha Badam singer Bhuban Badyakar : मुंबई : सध्या या सोशल मीडियाच्या जमान्यात कुणाचा व्हिडीओ व्हायरल होईल आणि कुणी एका रात्रीत प्रसिद्ध होईल हे सांगता येत नाही. असेच एक उदाहरण आहे कच्चा बादाम फेम गायक भुबन बड्याकर. त्यांचे कच्चा बादाम हे गाणे व्हायरल झाले आणि एका रात्रीत त्यांचे आयुष्य बदलले होते. आता बड्याकर म्हणाले की म्हणाले की मी आजही तोच शेंगदाणे विकणारा व्यक्ती आहे. आपल्याकडे अचानक एवढे पैसे आणि प्रसिद्धी आल्यामुळे आपण थार्यावर नव्हतो असे बड्याकर म्हणाले. परंतु आता आपली चूक लक्षात आली आहे आणि खर्या आयुष्यात आपण असे नाही असे बड्याकर यांनी सांगितले.
बड्याकर हे प्रसिद्धी झोतात आल्यानंतर त्यांना अनेक ठिकाणी गाणे गाण्यास बोलवले जात होते. अनेक वेळेला त्यांना मानधन दिले जात आणि त्यांना यातून खूप पैसे मिळाले होते. या पैश्यातून बड्याकर यांनी एक सेकंड हँड गाडी विकत घेतली होती. बड्याकर म्हणाले की आपल्याला अचानक पैसे आणि प्रसिद्धी मिळाल्याने आपलं डोकं फिरलं होता. परंतु आता आपल्याला सर्व कळालं असून आयुष्यात पुन्हा चूक होणार नाही असे बड्याकर म्हणाले आहेत. आपल्या आयुष्यात अशी एक वेळाली होती तेव्हा आपण विचार केला ही आता शेंगदाणे विकायची गरज नाही. परंतु ही सर्व माझी चूक होती, आपण कोणीही सेलिब्रिटी नाही. उद्या जर वेळ पडली तर आपण पुन्हा शेंगदाणे विकू. आता आपले पाय नेहमी जमिनीवर राहतील असेही बड्याकर म्हणाले. कच्चा बादाम नंतर बड्याकर यांनी आणखी दोन गाणी बनवली आहेत आणि ही गाणी प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. एका गाण्याचे नाव सारेगमपा आहे तर तर दुसर्या गाण्याचे नाव अमार नोतुन गारी आहे. या गाण्यांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांना आपल्या आयुष्याबद्दल सांगणार असल्याचे बड्याकर म्हणाले.
बड्याकर यांना केरळ आणि बांग्लादेशहून गाण्यासाठी आमंत्रण मिळत आहे. फक्त भारतच नव्हे तर दुबईतूनही त्यांना परफॉर्मन्ससाठी आमंत्रण मिळाले आहे. परंतु बड्याकर यांच्याकडे पासपोर्ट नाहिये तसेच त्यांच्या पत्नीला परदेशात जाण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी बड्याकर यांचा अपघात झाला होता. त्यांना तत्काळ एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,. सुदैवाने या अपघातात त्यांना फार लागले नव्हते. या अपघातानंतर आपले डोकं ठिकाणावर आल्याची प्रतिक्रिया बड्याकर यांनी दिली आहे.