कर्नाटक: पुरात आपला जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर चढली मगर, व्हिडिओ व्हायरल [Video]

व्हायरल झालं जी
Updated Aug 13, 2019 | 13:24 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

पुराचा फटका जनावरांनाही बसला आहे. कर्नाटकच्या रेबैग तालुक्यातील बेळगाव येथील एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक महाकाय मगर आपला जीव वाचवण्यासाठी एका घराच्या छतावर बसलेली दिसत आहे.

crocodile
मगर 

थोडं पण कामाचं

  • पुराच्या पाण्यापासून बचाव करताना दिसली मगर
  • घराच्या छतावर दिसली मगर
  • कर्नाटकच्या अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका

बंगळुरू: मुसळधार पावसामुळे दक्षिण भारतातील अनेक राज्यांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे महाराष्ट्र, केरळ, गुजरात आणि कर्नाटकातील अनेक जिल्हे प्रभावित झाले आहेत. भीषण पुरामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सगळीकडे हाहाकार माजला आहे. लोक आपला जीव वाचण्यासाठी जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत आहेत. 

पुराने सगळे काही उद्ध्वस्त केले आहे. या जीवघेण्या पुरातून वाचण्यासाठी केवळ मनुष्य प्राणीच नव्हे तर जनावरेही प्रयत्न करत आहेत. या दरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक मोठी महाकाय मगर घराच्या छतावर बसलेली दिसत आहे. ही महाकाय मगर घराच्या छतावर बसली आहे. हे घर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. मगरीला छतावर बसलेली पाहून कोणीही घाबरेल. 

व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे की महाकाय मगर आपले तोंड उघडून बसली आहे आणि आपला जीव वाचवण्यासाठी आतुर आहे. हा व्हिडिओ कर्नाटकातील रेबैग तालुक्यातील बेळगावचा आहे. या व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओ सोशल मीडियातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 

 

 

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. याआधी अशीच एक मगर गुजरातमध्ये दिसली होती. गुजरातमध्ये पुराने थैमान घातले आहे. पुरामुळे गुजरातच्या बनासकांठा, गांधीनगर, अहमदाबाद, कच्छ आणि सौराष्ट्र सहित इतर अनेक ठिकाणांना फटका बसला आहे. 

रिपोर्टनुसार कर्नाटकात आतापर्यंत ५ लाखाहून अधिक लोकांना पूरग्रस्त भागातून स्थलांतरित करण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम सातत्याने तेथे कार्यरत आहेत. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी पुराचा फटका बसलेल्या ठिकाणांचे हवाई पद्धतीने सर्वेक्षण केले. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी या पुरामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.  

महराष्ट्रातही कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना पुराचा मोठा तडाखा बसला.पुरामुळे येथील अनेकांचे संसार पाण्याखाली गेलेत. अद्यापही कोल्हापुरातून पूर्ण पाणी ओसरलेले नाही. ज्या ठिकाणी पाणी ओसरले त्या ठिकाणी आता रोगराईचे मोठे संकट उभे राहिले आहे. पुरामुळे उद्धवस्त झालेला संसार पुन्हा उभा करायचा कसा असा प्रश्न आता अनेक लोकांच्या समोर उभा राहिला आहे. पुराने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणले. होत्याचे नव्हते झाले. अनेकांनी आपल्या घरची माणसे गमावली. गुरे, जनावरे सारे सारे काही नजरेसमोरून वाहून गेले. कोल्हापुरात अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने अद्याप तेथील वाहतूक सुरळीत झालेली नाही. त्यामुळे दैनंदिन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
कर्नाटक: पुरात आपला जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर चढली मगर, व्हिडिओ व्हायरल [Video] Description: पुराचा फटका जनावरांनाही बसला आहे. कर्नाटकच्या रेबैग तालुक्यातील बेळगाव येथील एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक महाकाय मगर आपला जीव वाचवण्यासाठी एका घराच्या छतावर बसलेली दिसत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...