IT JOB सोडून गाढविणीचे दूध विकून कमावले लाखो रुपये

Karnataka Man Starts Donkey Farm After Quitting IT Job, Now Gets Milk Orders Worth Rs 17 Lakh : आयटी क्षेत्रातली नोकरी म्हणजे मोठा पगार असा सर्वसाधारण समज आहे. पण एका व्यक्तीने आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून गाढविणीचे दूध विकण्याचा निर्णय घेतला.

Karnataka Man Starts Donkey Farm After Quitting IT Job, Now Gets Milk Orders Worth Rs 17 Lakh
IT JOB सोडून गाढविणीचे दूध विकून कमावले लाखो रुपये  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • IT JOB सोडून गाढविणीचे दूध विकून कमावले लाखो रुपये
  • आयटीतील नोकरी सोडणाऱ्याने गाढविणीचे दूध विकण्यासाठी एक फर्म सुरू केली
  • फर्मला आतापर्यंत १७ लाखांच्या ऑर्डर मिळाल्या

Karnataka Man Starts Donkey Farm After Quitting IT Job, Now Gets Milk Orders Worth Rs 17 Lakh : आयटी क्षेत्रातली नोकरी म्हणजे मोठा पगार असा सर्वसाधारण समज आहे. पण एका व्यक्तीने आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून गाढविणीचे दूध विकण्याचा निर्णय घेतला. आयटीतील नोकरी सोडणाऱ्याने गाढविणीचे दूध विकण्यासाठी एक फर्म सुरू केली आहे. या फर्मला आतापर्यंत १७ लाखांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. ऑर्डर आणखी वाढतील असा विश्वास गाढविणीचे दूध विकणाऱ्याला वाटत आहे.

कर्नाटकमधील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ४२ वर्षांच्या श्रीनिवास गौडा यांनी त्यांच्या गावात एक गाढवांची फर्म सुरू केली आहे. याआधी केरळमधील एर्नाकुलम येथे एक गाढवांची फर्म सुरू झाली. आतापर्यंत भारतात एर्नाकुलम येथे एक आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात एक अशा दोन गाढवांच्या फर्म सुरू झाल्या आहेत. 

पदवीधर असलेले गौडा २०२० पर्यंत सॉफ्टवेअर कंपनीत होते. पण लॉकडाऊन काळात त्यांनी नोकरी सोडून इरा नावाच्या गावात २.३ एकर भूखंड खरेदी केला. या भूखंडावर आधी त्यांनी ससे, कोंबड्या, कडकनाथ कोंबड्या, बकऱ्या पाळल्या. पण गाढविणीचे दूध खपेल याचा अंदाज येताच त्यांनी २० गाढविणी खरेदी करून त्या स्वतःच्या मालकीच्या भूखंडावर आणून ठेवल्या. यानंतर गौडा यांनी गाढविणीचे दूध पिण्याचे फायदे याविषयी माहिती देण्यास सुरुवात केली. याचे चांगले परिणाम दिसून आले.

गाढविणीचे दूध चविष्ट आणि औषधी गुणधर्म असलेले असे असते. यामुळे गाढविणीच्या दुधाच्या सेवनाने आरोग्याला लाभ होतो; असे गौडा यांनी सांगितले. जशी जशी लोकांना जाणीव होत आहे. अनेकांकडून गौडा यांच्याकडे गाढविणीच्या दुधासाठी मागण्या येत आहेत. आतापर्यंत गाढविणीचे दूध खरेदी करण्यासाठी १७ लाख रुपयांच्य ऑर्डर आल्या आहेत. गौडा लवकरच मॉल, सुपरमार्केट, मोठी दुकानं यांच्या माध्यमातून ३० मिली गाढविणीचे दूध १५० रुपये या दराने विकणार आहेत. यासाठीची तयारी सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी