नवी दिल्ली: हे जग अनेक अनोख्या गोष्टींनी परिपूर्ण आहे, वेगवेगळ्या गोष्टी येथे घडतात ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटेते. आपण बाहुल्या मुलांच्या मनोरंजनाचा एक भाग मानतो, पण आता बाहुल्या मुलांच्या खेळण्यांमधून बाहेर पडून मानवी जीवन साथीचे रूप घेत आहेत. असेच काहीसे कझाकस्तानमधील युरी टोलोचको नावाच्या बॉडीबिल्डरसोबत घडले आहे.
कझाकस्थित बॉडीबिल्डरकडे मार्गो नावाची एक सेक्स डॉल आहे जिच्याशी त्याने नुकतेच लग्न केले आहे. टोलोचको आणि मार्गोच्या लग्नाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकं यावर भाष्यही करत आहेत.
टोलोचको यांनी २०१० मध्ये मार्गो हिला प्रपोज केले होते, त्यानंतर मार्चमध्ये तो तिच्याशी लग्न करणार होता परंतु कोरोनाव्हायरस साथीच्या रोगामुळे, त्याला ही योजना पुढे ढकलावी लागली.
कोरोनाव्हायरसमुळे लग्नाची योजना पुढे ढकलल्यानंतर, ऑक्टोबरमध्ये जेव्हा टोलोचको त्याच्या सेक्स डॉल्ससह लग्न करणार होता. परंतु ट्रान्सजेंडरद्वारा आयोजित केलेल्या मोर्चाने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर त्याची योजना पुढे ढकलली गेली.
काही माध्यमांच्या वृत्तानुसार, टोलोचको विवाहाचा प्रस्ताव ठेवण्यापूर्वी ८ महिन्यांपासून मार्गाशी संबंध ठेऊन होता. लग्न करण्यापूर्वी, टोलोचको त्याच्या सेक्स डॉलमध्ये काही बदल करण्यासाठी क्लिनिकमध्ये घेऊन गेला. तो असा विचार करत असे की मार्गोला तिच्या लूकबद्दल थोडी चिंता आहे. "जेव्हा मी तिचा फोटो जगासमोर दाखविला, तेव्हा तिच्यावर बरीच टीका झाली ज्यामुळे ती अस्वस्थ झाली, म्हणूनच आम्हाला वाटले की प्लास्टिक सर्जरी करावी. ती आता खूप बदलली आहे. सुरुवातीला हे स्वीकारणे थोडे अवघड होते परंतु नंतर मला याची सवय झाली." असे टोलोचको म्हणाला.
गेल्या वर्षी, अमेरिकन वंशाच्या एका महिलेने तिच्या झोम्बी बाहुल्याशी लग्न केले. तिने सांगितले की तिचा बाहुला ३७ वर्षांचा आहे. असेच काहीतरी ऱ्होड आयलँडच्या टाव्हरटोन येथे राहणाऱ्या फेलीसिटी कडलेक यांनी केले. त्याने त्याची बाहुली केली रॉसीशी लग्न केले ज्याचा संपूर्ण खर्च ३५००० होता. कुटुंबातील ४ सदस्यांसह इतर ८ बाहुल्या देखील या लग्नात सामील झाल्या होत्या.