Man Death Viagra Overdose : व्हायग्रा घेणे पडले महागात, सेक्स करताना ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी मुंबईत आणि नागपुरात सेक्स करताना दोघांचा मृत्यू झाला होता. दोन्ही घटनेत व्यक्तींनी आधी वायग्रा घेतल्याचे समोर आले होते. अशीच एक घटना केनियामध्ये घडली आहे. एक ४७ वर्षीय व्यक्ती व्हायग्रा घेऊन आपल्या प्रेयसीसोबत सेक्स करत होता. परंतु सेक्स दरम्यान या  व्यक्तीची तब्येत बिघडली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पाकिटातून व्हायग्राच्या गोळ्या आढळल्या होत्या. 

man died viagra overdose
मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एक ४७ वर्षीय व्यक्ती व्हायग्रा घेऊन आपल्या प्रेयसीसोबत सेक्स करत होता.
  • परंतु सेक्स दरम्यान या  व्यक्तीची तब्येत बिघडली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
  • त्याच्या पाकिटातून व्हायग्राच्या गोळ्या आढळल्या होत्या. 

Man Death Viagra Overdose : नैरोबी : काही दिवसांपूर्वी मुंबईत आणि नागपुरात सेक्स करताना दोघांचा मृत्यू झाला होता. दोन्ही घटनेत व्यक्तींनी आधी वायग्रा (viagra) घेतल्याचे समोर आले होते. अशीच एक घटना केनियामध्ये (kenya) घडली आहे. एक ४७ वर्षीय व्यक्ती व्हायग्रा घेऊन आपल्या प्रेयसीसोबत सेक्स करत होता. परंतु सेक्स दरम्यान या  व्यक्तीची तब्येत बिघडली आणि त्यातच त्याचा मृत्यू (death) झाला. त्याच्या पाकिटातून व्हायग्राच्या गोळ्या आढळल्या होत्या. (kenya 47 year old man died while intercourse viagra overdose )

अधिक वाचा : गर्लफ्रेंडसोबत सेक्स करत असताना मुलाचा चुकून आईला लागला फोन, त्यानंतर असे काही घडले...

मिळालेल्या माहितीनुसार केनियातील डग्लस मुथुरी ही ४७ वर्षीय व्यक्ती आपल्या प्रेयसीसोबत रोमॅंटिक डिनरला गेला होता. डिनरनंतर ते आपल्या रूमवर गेले. सेक्स करत असताना अचानक डग्लसची तब्येत बिघडली. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर डग्लस बेशुद्ध पडला. डग्लच्या प्रेयसीने तातडीने डॉक्टरांना बोलवले. डॉक्टरांनी त्याला तपासले असता तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी येऊन डग्लच्या घराची आणि पाकिटाची झडती घेतली. तेव्हा डग्लच्या पाकिटात उच्च रक्तदाबाची औषधं आणि व्हायग्राच्या गोळ्या आढळल्या. डग्लच्या अंगावर कुठल्याही जखमा आढळल्या नाहीत.  

अधिक वाचा : Viagra Overdose : गर्लफ्रेंडसोबत सेक्स करताना तरुणाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू, पोलिसांना पॅन्टीच्या खिशात सापडल्या व्हायग्राच्या गोळ्या


मुंबईतील कुर्ल्यातील घटना

कुर्ल्यात मे महिन्यात एक ६१ वर्षीय व्यक्ती आपल्या प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेला होता. तेव्हा त्याने दारूचे आणि व्हायग्राचे सेवन केले होते. सेक्सदरम्यान त्याची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध झाला. त्या महिलेने तत्काळ हॉटेलच्या कर्मचार्‍यांना याबद्दल माहिती दिली, त्यांनी लगेच डॉक्टर आणि पोलिसांना बोलावले. परंतु त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. 

अधिक वाचा : Monkeypox Disease: सेक्स केल्याने देखील 'मंकीपॉक्स' विषाणू पसरू शकतो, तज्ञांनी दिला इशारा 

नागपुरातही तरुणाचा मृत्यू

नागपुरात एका २५ वर्षीय तरुणाचा व्हायग्राच्या ओवरडोसमुळे मृत्यू झाला होता. नागपुरात एक तरुण आपल्या प्रेयसीसोबत एका लॉजमध्ये गेला होता. तेव्हा सेक्सदरम्यान त्याची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध झाला. कार्डियेक अरेस्टमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पण्ण झाले.

अधिक वाचा : NFHS-5 : आता पुरुषांचाही बदलला मूड, या तीन परिस्थितींमध्ये सेक्स करण्यास नकार

व्हायग्राचे साईड इफेक्ट्स

व्हायग्रामुळे रक्तदाब वाढतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचाही धोका वाढतो. तसेच व्हायग्राचे नियमित सेवन केल्यामुळे माणूस आंधळा होऊ शकतो. तसेच पाठदुखी, उल्टी  आणि हृदयविकाराचाही त्रास होऊ शकतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी