FIFA Wolrd Cup 2022 : फुटबॉल वर्ल्डकपवरून केरळमध्ये हाणामारी

Kerala : Case Registered After Argentina and Brazil Fans Clash During Road Show In Kollam Watch Video : कतारमध्ये फुटबॉल वर्ल्डकप सुरू आहे. या फिफा वर्ल्डकप 2022 मधील अर्जेंटिना आणि ब्राझील मॅचच्या मुद्यावरून चाहत्यांमध्ये केरळ येथे वाद झाला.

Kerala : Case Registered After Argentina and Brazil Fans Clash
फुटबॉल वर्ल्डकपवरून केरळमध्ये हाणामारी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • FIFA Wolrd Cup 2022 : फुटबॉल वर्ल्डकपवरून केरळमध्ये हाणामारी
  • अर्जेंटिना आणि ब्राझील मॅचच्या मुद्यावरून चाहत्यांमध्ये हाणामारी
  • हाणामारीचा Video व्हायरल

Kerala : Case Registered After Argentina and Brazil Fans Clash During Road Show In Kollam Watch Video : कतारमध्ये फुटबॉल वर्ल्डकप सुरू आहे. या फिफा वर्ल्डकप 2022 मधील अर्जेंटिना आणि ब्राझील मॅचच्या मुद्यावरून चाहत्यांमध्ये केरळ येथे वाद झाला. वाद वाढला आणि नंतर दोन्ही टीमच्या चाहत्यांमध्ये हाणामारी झाली. 

केरळमध्ये शक्तिकुलंगरा ग्रामीण येथे अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या समर्थकांनी दोन स्वतंत्र रोड शो आयोजीत केले होते. या दोन्ही रोड शो चे सदस्य एकमेकांसमोर आले आणि हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. केरळ पोलिसांनी कोल्लममधील शक्तिकुलंगरा पोलीस ठाण्यात आयपीसी 160 अंतर्गत गुन्हा दाखल केला. हाणामारी प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

केरळमध्ये फुटबॉलप्रेमींची संख्या मोठी आहे. याच कारणामुळे फिफा वर्ल्डकप 2022 कतारमध्ये सुरू असला तरी केरळमध्ये फुटबॉलमय वातावरण झाले आहे. विशेष म्हणजे फुटबॉलच्या 17 चाहत्यांनी एकत्र येऊन एक 23 लाख रुपयांचे घर खरेदी केले आहे. या घरात स्टार फुटबॉलपटूंचे पोस्टर लावण्यात आले आहेत. तसेच घरावरती वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेल्या सर्व टीमचे झेंडे लावण्यात आले आहेत. घरात एक मोठा टीव्ही स्क्रीन बसविण्यात आला आहे. या स्क्रीनवर फुटबॉलचे 17 चाहते एकत्र बसून फुटबॉल वर्ल्डकप बघणार आहेत. 

Suryakumar Yadav: सूर्याला कधी मिळणार कसोटी खेळण्याची संधी? खुद्द क्रिकेटरने दिले याचे उत्तर

IND vs NZ 2nd T-20: सूर्यकुमारची झुंझार खेळी अन् भारतीय बॉलर्सची दमदार कामगिरी,  टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 65 रन्सने विजय

कुठे बघाल फिफा वर्ल्डकप 2022?

भारतात फिफा वर्ल्डकप 2022 प्रसारित करण्याचे अधिकार वायकॉम-18 यांच्याकडे आहेत. फुटबॉल वर्ल्डकपच्या मॅच स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 HD या दोन टीव्ही चॅनलवर बघता येईल. तसेच Voot Select आणि JIO TV वर लाइव्ह स्ट्रीमिंग बघता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी