Viral News : डॉक्टरांनी सुंदर हस्ताक्षरात लिहिली औषधांची चिठ्ठी, नेटकरी झाले आश्चर्यचकित

Neat Handwriting on Prescription: एका डॉक्टराने सुंदर हस्ताक्षरात औषधाची चिठ्ठी लिहून दिली आहे. डॉक्टरांनी सुवाच्य अक्षरात ही चिठ्ठी लिहिली असून ही अक्षरं छापल्यासारखी वाटतात अशी प्रतिक्रिया काही नेटकर्‍यांनी दिली आहे. 

doctor prescription viral
व्ह्यायरल न्युज 
थोडं पण कामाचं
  • एका डॉक्टराने सुंदर हस्ताक्षरात औषधाची चिठ्ठी लिहून दिली आहे.
  • डॉक्टरांनी सुवाच्य अक्षरात ही चिठ्ठी लिहिली
  • ही अक्षरं छापल्यासारखी वाटतात अशी प्रतिक्रिया काही नेटकर्‍यांनी दिली आहे. 

Neat Handwriting on Prescription: आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा कधी कधी डॉक्टर आपल्याला बाहेरची औषधं लिहून देतो. डॉक्टर आपल्या विचित्र अक्षरांत या प्रिस्क्रिप्शन लिहून देतो ज्या फक्त मेडिकलवाल्याला कळतात. डॉक्टरांच्या या अक्षरावर अनेक जोक्स, मीम्स इतकेच काय विनोदी व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. परंतु एका डॉक्टराने सुंदर हस्ताक्षरात औषधाची चिठ्ठी लिहून दिली आहे. डॉक्टरांनी सुवाच्य अक्षरात ही चिठ्ठी लिहिली असून ही अक्षरं छापल्यासारखी वाटतात अशी प्रतिक्रिया काही नेटकर्‍यांनी दिली आहे. 

अधिक वाचा : World richest person: फक्त दोन मिनिटांसाठी ही व्यक्ती झाली होती जगात सर्वात श्रीमंत! असा झाला चमत्कार

अधिक वाचा :   Banana Snake : ही केळी नव्हे तर साप, केळी सारख्या दिसणार्‍या सापाचा व्हिडीओ व्हायरल

@Thalapathiramki या ट्विटर अकाऊंटवरून ही चिठ्ठी पोस्ट करण्यात आली आहे. केरळच्या एका डॉक्टरांनी ही चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीवर डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णासाठी औषधं लिहून दिली आहे. हे अक्षर इतके सुंदर आहे की नेटकरी डॉक्टरांच्य अक्षराच्या प्रेमात पडले आहे. साधारणतः सामन्य नागरिकांना अशा चांगल्या अक्षरात प्रिस्क्रिप्शन पाहण्याची सवय नसते. आता डॉक्टरांनी एवढ्या सुंदर अक्षरात चिठ्ठी लिहिल्याने ते अचंबित झाले आहे. त्यांनी डॉक्टरांची प्रशंसा केली आहे. एका नेटकर्‍याने आपण आश्चर्यचकित झाल्याचे म्हटले आहे. तसेच एका नेटकर्‍याने हे अक्षर किती सुंदर आहे जणून्काही प्रिटिंग मशीनमधून छापले गेले आहेत असे म्हटले आहे. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी