Online Shopping Fraud मागवला आयफोन, मिळालं असं काही की ग्राहकाला बसला धक्का

ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढत आहे. पण या ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक होण्याच्या प्रकारांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र आहे.

Kerala man orders iPhone 12 receives bar of soap and Rs 5 coin
Online Shopping Fraud मागवला आयफोन, मिळालं असं काही की ग्राहकाला बसला धक्का 
थोडं पण कामाचं
  • Online Shopping Fraud मागवला आयफोन, मिळालं असं काही की ग्राहकाला बसला धक्का
  • ऑनलाइन शॉपिंगमध्ये झालेल्या फसवणुकीप्रकरणी पोलिसांकडे तक्रार
  • ग्राहकाला पैसे परत मिळाले

अलुवा: ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढत आहे. पण या ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक होण्याच्या प्रकारांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र आहे. केरळमधील अलुवामध्ये राहणाऱ्या नूरुल अमीन याने ऑनलाइन पैसे देऊन अॅमेझॉनवरुन आयफोन मागवला. पण त्याला भांडी धुण्याचा एक विम साबण आणि पाच रुपयांचं नाणं मिळालं. हे पाहून नूरुल अमीनला धक्का बसला. Kerala man orders iPhone 12 receives bar of soap and Rs 5 coin

नूरुलने अॅमेझॉनकडून आलेले पॅक उघडताना एक व्हिडीओ तयार केला होता. यामुळे फसवणुकीचा ठोस पुरावा त्याच्या हाती आहे. या प्रकरणात तक्रार केल्यानंतर अॅमेझॉनकडून आयफोनसाठी घेतलेली सर्व रक्कम नूरुलच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आली. 

अॅमेझॉनवरुन आयफोन बारा मागवला होता. या फोनसाठी ऑनलाइन पद्धतीने नूरुलने ७० हजार ९०० रुपये दिले होते. पण आयफोनच्या ऐवजी भांडी धुण्याचा एक विम साबण आणि पाच रुपयांचं नाणं मिळालं. नूरुलने नियमानुसार अॅमेझॉनकडे तक्रार नोंदवली. अॅमेझॉनने नियमानुसार नूरुलला त्याने आयफोनसाठी मोजलेले पैसे परत केले. 

नूरुलने ऑनलाइन शॉपिंगमध्ये झालेल्या फसवणुकीप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. नूरुलने जो फोन मागवला होता तो झारखंडमध्ये एक व्यक्ती वापरत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. पण फसवणुकीच्या तुलनेत मागवलेल्या वस्तू मिळण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे आजही नागरिक सोयीचे म्हणून ऑनलाइन शॉपिंग करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन मागवलेल्या वस्तूसाठी आधीच पैसे दिले असल्यास पॅक उघडताना व्हिडीओ तयार करण्याचे आवाहन केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी