KGF 2: नवरदेवच झाला रॉकी भाईचा जबरा फॅन! यश हा डायलॉग म्हणून केलं चकित

KGF Chapter 2 famous dialogue on wedding card : एका 'KGF-2' च्या चाहत्याला त्याच्या लग्नाच्या कार्डावर छापलेला 'रॉकी भाई' मधील आयकॉनिक डायलॉग मिळाला. होय, हा डायलॉग ऐकल्यानंतर तुम्ही नक्कीच शिट्ट्या वाजवल्या असतील. त्यामुळेच ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

KGF 2: Rocky Brother's such a big fan! This dialogue was printed on a wedding magazine
KGF 2: नवरदेवच झाला रॉकी भाईचा जबरा फॅन! लग्न पत्रिकेवर छापला हा डायलॉग  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • यशचा केजीएफ चॅप्टर 2 प्रसिद्ध डायलॉग वेडिंग कार्डवर
  • वायलेन्स...वायलेन्स...वायलेन्स डायलाॅग सगळ्यांच्या ओठावर
  • नवरदेवने यशच्या डायलाॅगला दिला ट्विस्ट

मुंबई : आजकाल हवापाण्याच्या गप्पा झाल्यानंतर जो तो 'KGF Chapter 2' (KGF-2) पाहिला का? खरंच... 'रॉकी' फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर लोकांच्या हृदयावरही धुमाकूळ घालत आहे. म्हणूनच 'KGF-2' च्या एका चाहत्याला त्याच्या लग्नाच्या कार्डावर 'रॉकी भाई'चा एक आयकॉनिक डायलॉग छापून आला. होय, हा डायलॉग ऐकून तुम्ही नक्कीच शिट्ट्या वाजवल्या असतील. त्यामुळेच आता ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (KGF 2: Rocky Brother's such a big fan! This dialogue was printed on a wedding magazine)

अधिक वाचा : 'शौक बड़ी चीज है!', नोकरीचा धोका पत्करूनही मध्येच थांबली ट्रेन

काही दिवसांपूर्वी पर्यंत अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा राज' मधला 'मैं झुकेगा नहीं' हा डायलॉग लोकांच्या ओठांवर व्हायरल झाला होता. आता केजीएफ चॅप्टर २ मधला यशचा वायलेन्स...वायलेन्स...वायलेन्स, आय डोन्ट लाइक इट....आय अवॉइड बट...वायलेन्स लाइक्स मी...आय कान्ट अवॉइड हा प्रत्येकाच्या मुखात आहे.

रॉकी चित्रपटात बोलतो - Violence, Violence, Violence...I Don’t Like It. I Avoid! But... Violence Likes Me, I Can’t Avoid! ! फॅनने हा डायलॉग आपल्या लग्नाच्या कार्डवर अनोख्या पद्धतीने छापला आहे. अभिनेता यश म्हणजेच 'रॉकी' हा डायलॉग बोलतो जेव्हा तो अधीरासमोर उभा राहतो आणि त्याच्यावर गोळ्या झाडतो. लग्नपत्रिकेचा हा फोटो ट्विटर यूजर @MISS_BINGG ने शेअर केला आहे. त्या व्यक्तीने या डायलॉगला ट्विस्ट दिला

लग्न... लग्न... लग्न...

या वेडिंग कार्डमध्ये लग्नाची सर्व माहिती आहे. पण कार्डच्या खालच्या बाजूला बघितल्यावर रॉकी भाईचा डायलॉग वेगळ्या पद्धतीने लिहिलेला दिसतो - Marriage... Marriage...Marriage. I dont Like it, I avoid, but my relatives like Marriage i can't avoid.'' अर्थ- लग्न… लग्न… लग्न. मला ते आवडत नाही, मी टाळतो, पण माझ्या नातेवाईकांना लग्न आवडते. त्यामुळे मी ते टाळू शकत नाही.

अधिक वाचा : Viral: बिहारच्या मुलावर ऑस्ट्रेलियन तरूणी फिदा; सातासमुद्रापार जाऊन केले लग्न

5 दिवसात 215 कोटींची कमाई

अभिनेता यश स्टारर 'KGF: Chapter 2' या चित्रपटाने 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेल्या पहिल्या पाच दिवसांत 215 कोटींची कमाई केली आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटात यश व्यतिरिक्त संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी सारखे दमदार कलाकार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी