बसमध्ये रडत होता चिमुकला, ड्रायव्हर आणि कंडक्टरने विचारले तर झाला मोठा खुलासा 

मुलाला त्याला घरचा पत्ता विचारला तेव्हा त्याला सांगता आला नाही. त्यानंतर कंडक्टरने त्याला घरचा नंबर विचारला तेव्हा मुलाने घरचा नंबर दिला.  त्यानंतर घरच्यांशी बोलणे झाले. त्यानंतर खुलासा झाला की या मुलाचे मुरादा

kidnapped child found bus driver conductor police moradabad ghaziabad uttar pradesh noida
बसमध्ये रडत होता चिमुकला, मुलाला विचारले झाला मोठा खुलासा  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • उत्तर प्रदेशच्या गाजियाबादहून मुरादाबाद येथे जाणाऱ्या एका बसमध्ये एक लहान चिमुरडा रडत होता.
  • बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी मुलाची विचारपूस केली तेव्हा एक मोठा खुलासा झाला.
  • या मुलाचे अपहरण झाले होते आणि तो अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटून आला होता. ड्रायव्हर आणि कंडक्टरने आता त्या मुलाला पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. 

मुरादाबाद :  उत्तर प्रदेशच्या गाजियाबादहून मुरादाबाद येथे जाणाऱ्या एका बसमध्ये एक लहान चिमुरडा रडत होता. बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी मुलाची विचारपूस केली तेव्हा एक मोठा खुलासा झाला. या मुलाचे अपहरण झाले होते आणि तो अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटून आला होता. ड्रायव्हर आणि कंडक्टरने आता त्या मुलाला पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. 

ग्रेटर नोएडा बस डेपोमध्ये एक बस उभी होती. ही बस गाजियाबाद होऊ मुरादाबाद येथे जात होती. या बसमध्ये ड्रायव्हर विकल आणि बसचा कंडक्टर दीपकने एक अज्ञात मुलाला बसमध्ये रडताना पाहिले. त्यानंतर त्यांनी त्या मुलाची विचारपूस केली, त्याच्या कुटुंबियाबद्दल विचारले. 

मुलाला त्याला घरचा पत्ता विचारला तेव्हा त्याला सांगता आला नाही. त्यानंतर कंडक्टरने त्याला घरचा नंबर विचारला तेव्हा मुलाने घरचा नंबर दिला.  त्यानंतर घरच्यांशी बोलणे झाले. त्यानंतर खुलासा झाला की या मुलाचे मुरादाबाद येथून अपहरण झाले होते. 

यानंतर विकल आणि दीपक यांनी पोलिसांना फोन केला आणि त्यांना माहिती दिली. सूचना मिळाल्यावर मुरादाबाद एसपीआरए विद्यासागर मिश्रा यांच्या आदेशानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टरने मुलाला सुरक्षित मुरादाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर परिवहन मंत्री अशोक कटारिया यांनी ड्रायव्हर आणि कंडक्टरची प्रशंसा केली आणि दोघांना सन्मानित केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी