King Cobra in Toilet: टॉयलटमध्ये दिसला साप; काढला फणा, व्हिडीओ व्हायरल

साप हा फार विषारी प्राणी आहे. साप दिसला की भल्या भल्यांची गाळण उडते. सापांमध्ये किंग कोब्रा हा सर्वाधिक विषारी साप मानला जातो. साप हा जंगलात किंवा झाडाझुडपांमध्ये आढळला जातो. कधी कधी आपल्या घरातही घुसतो. ग्रामीण भागात घरात, गोठ्यातही साप आढळतात.

king kobra
किंग कोब्रा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • साप हा फार विषारी प्राणी आहे.
  • साप दिसला की भल्या भल्यांची गाळण उडते.
  • सापांमध्ये किंग कोब्रा हा सर्वाधिक विषारी साप मानला जातो.

King Cobra in Toilet: बीड : साप हा फार विषारी प्राणी आहे. साप दिसला की भल्या भल्यांची गाळण उडते. सापांमध्ये किंग कोब्रा हा सर्वाधिक विषारी साप मानला जातो. साप हा जंगलात किंवा झाडाझुडपांमध्ये आढळला जातो. कधी कधी आपल्या घरातही घुसतो. ग्रामीण भागात घरात, गोठ्यातही साप आढळतात. काही लोक घाबरून या सापाला मारून टाकतात तर काही लोक सर्पमित्रांना बोलावून या सापाला पकडतात आणि सुखरुप जंगलात सोडून देतात.

अधिक वाचा : Optical Illusion : झेब्राच्या गर्दीत लपला आहे वाघ, दाखवा शोधून

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका घरातील शौचालयात किंग कोब्रा आढळला आअहे. इतकेच नाही तर हा कोब्रा चांगलाच चिडला असून त्याने फणा काढला आहे.

अधिक वाचा : Miracle : पिल्लू खड्ड्यात पडल्यामुळे हत्तीण झाली बेशुद्ध, मग घडला चमत्कार, पाहा VIDEO

हा किंग कोब्रा एका घरातील शौचालयात घुसला होता. या सापाला पाहून घरातील सदस्य घाबरले होते. त्यांनी तत्काळ सर्पमित्र आकाश जाधव आणि त्यांच्या सहकार्याला बोलावून घेतले. आकाश जाधव यांनी टॉयलेटच्या पाईपला बाहेरून कपड्याच्या साहाय्याने बंद केले जेणेकरून साप बाहेर पडू नये. नंतर मोठ्या शिताफीने या सापला आकाश जाधव यांनी पकडले.

अधिक वाचा : Optical Illusion : जर तुमची तल्लख बुद्धी आणि तीक्ष्ण नजर असेल, तर चित्रातून मांजर दाखवा शोधून

टॉयलेटच्या सीटमधून काढला फणा

जेव्हा सर्पमित्र या सापला रेस्क्यु करण्यासाठी आले तेव्हा त्यांनी ही संपूर्ण घटना शूट केली. आधी जाधव आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या टॉयलेटमध्ये पाणी टाकले, त्यामुळे साप बाहेर आला. परंतु लोकांना पाहून हा साप परत पाईपमधे घुसला. त्यानंटर हा साप टॉयलेटच्या बाऊलमध्ये घुसला. त्यानंतर हा साप टॉयलेट सीटमधून बाहेर येतो. हा साप चांगलाच चिडला होता आणि जोरात फुत्कारत होता. त्याचे फुत्कार पाहून लोक घाबरूनच गेले होते.

अधिक वाचा : MacDonald’s Drama : मॅकडोनल्डनं कॅन्सल केली ऑर्डर, रागावलेल्या महिलेनं उचललं टोकाचं पाऊल, पाहा VIDEO

सर्पमित्र आकाश जाधव यांनी ही घटना शूट केली आणि आपल्या युट्युब चॅनेलवर पोस्ट केली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील आहे. आकाश जाधव यांनी हा साप पकडला असून त्याला सुखरुप जंगलात सोडून दिले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला एक कोटीहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी