Sudha Murthy:अब्जाधीश असूनही विकत आहेत भाज्या, व्हायरल झाला फोटो

व्हायरल झालं जी
Updated Sep 14, 2020 | 12:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

sudha murty photo: सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यात एक महिला भाजीच्या दुकानामध्ये बसलेली दिसत आहे. फोटोत असा दावा केला जात आहे की त्या सुधा मूर्ती आहेत. 

sudha murty
अब्जाधीश असूनही विकत आहेत भाज्या, व्हायरल झाला फोटो 

थोडं पण कामाचं

  • सुधा मूर्ती यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
  • सुधा मूर्ती इन्फोसिसच्या संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. 
  • सुधा मूर्ती यांची नेहमी साधी राहणी असते.

मुंबई : आपली साधी राहणी आणि उच्च विचारसरणीमुळे सर्वांमध्ये लोकप्रिय असलेल्या सुधा मूर्ती(sudha murty) यांना कोण ओळखत नाही?  सुधा मूर्ती अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी समाजासमोर आपला मोठा आदर्श ठेवला आहे. आपल्या कामाने त्यांनी मानाची एक नवी उंची गाठली आहे. श्रीमंत असूनही त्यांची साधी राहणी यामुळेच त्यांचा आपलेपणा वाढवते. सध्या सोशल मीडियावर(social media) एक फोटो व्हायरल(photo viral) होत आहे. या फोटोची लोक तोंडभरून स्तुती करत आहेत. या फोटोत सुधा मूर्ती एका दुकानात बसून भाज्या विकताना दिसत आहेत. 

नारायण मूर्ती यांची पत्नी आहे सुधा मूर्ती

सुधा मूर्ती आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची पत्नी आहे. मात्र त्यांची ओळख केवळ नारायण मूर्ती यांची पत्नी इतकीच मर्यादित नाही. तर त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली आहे. इन्फोसिस कंपनी उभारण्यात जितके योगजान नारायण मूर्ती यांचे आहे तितकेच योगदान सुधा मूर्तींचेही आहे. सुधा या प्रसिद्ध लेखिकाही आहेत. त्यांनी आतापर्यंत ९०हून अधिक भाषांमध्ये पुस्तके लिहिली आहेत. 

व्हायरल झाला फोटो

सोशल मीडियावर सुधा मूर्तींचा जो फोटो व्हायरल होत आहे त्यात त्या भाजी विकताना दिसत आहेत. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की त्या वर्षातून एकदा भाजी विकतात. फोटोत कॅप्शन असे दिले आहे की कोट्यावधींची मालकीण असूनही इतके साधे जीवन जगणे सोपी गोष्ट नव्हे. मात्र त्यांचे व्यक्तिमत्वच तसे आहे. 

वर्षातून एकदा करतात हे काम

फेसबुकवर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये असे लिहिले आहे की, फोटोत दिसत असलेल्या महिला या सुधा मूर्ती असून ज्या नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. तसेच इन्फोसिसच्या सहसंस्थापक आहेत. अब्जाधीश असूनही या भाजी विकत आहेत. असं सांगतात की वर्षातील एक दिवस त्या तिरुमाला बालाजी मंदिरात जातात आणि तीन दिवस जनसागर स्थित राघवेंद्र स्वामी मठात भाज्या कापतात. दरवर्षी त्या हे काम करतात ज्यामुळे येणाऱ्या पैशामुळे कोणत्याही प्रकारचा अहंकार निर्माण होऊ नये. त्यांची ही विन्रमता कायम राखण्यासाठी त्यांना सॅल्यूट.

सुधा मूर्ती गेली अनेक वर्षे समजापयोगी कामे करत आहेत. त्यांनी तीन हजार सेक्स वर्कर्सच्या पुनर्वसनासाठी १८ वर्षे घालवली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी