अबब! १४८ किलो वजन आणि माणसाएव्हढी उंची, किंमत ऐकून व्हाल अवाक

देशभरात ‘बकरी ईद’चा सण १ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. बकरी ईदच्या निमित्तानं छत्तीसगढच्या दुर्ग जिल्ह्यात सध्या एक बकरा आपली उंची आणि किमतीमुळे सध्या खूप चर्चेत आहे. जाणून घ्या याबाबत...

Bakrid 2020
१४८ किलो वजन आणि माणसाएव्हढी उंची,किंमत ऐकून व्हाल अवाक  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पंजाबमधून भिलाईला आला एक खास जातीचा बकरा
  • बकरी ईदसाठी आलेल्या या बकऱ्याची उंची ८ फूट तर वजन १४८
  • बकऱ्याची किंमत आहे तब्बल दीड लाख रुपये

नवी दिल्ली: ईद-उल-फितर मुस्लिम समाजाच्या मोठ्या सणांपैकी एक आहे. या दिवशी मुस्लिम घरांमध्ये कुर्बानी देण्याची प्रथा आहे. यावर्षी जगभरात ३१ जुलैला ईद साजरी केली गेली. पण दिल्लीतील जामा मस्जिदच्या शाही इमामांनी भारतात १ ऑगस्टला बकरी ईद साजरी केली जाईल, हे जाहीर केलंय. बकरी ईदच्या निमित्तानं यावर्षी अनेक वर्षांच्या तुलनेत बाजारांमधील रौनक गायब झालेली आहे. कुर्बानीवाल्या बकऱ्यांची विक्रीत सुद्धा कमतरता आलीय. यासर्वांमध्ये छत्तीसगढ इथला एक बकरा सध्या चर्चेत आहे. ८ फूट हून अधिक उंची असलेल्या या बकऱ्याचं वजन १४८ किलो आहे.

बकऱ्याला बघण्यासाठी उसळली गर्दी

एका टीव्ही चॅनेलच्या बातमीनुसार, हा बकरा बघून प्रत्येक जण आश्चर्यचकित होत आहे. पंजाबमधून खास भिलाईला मागवलेल्या या बकऱ्याला बघण्यासाठी लोकांची गर्दी उसळत आहे. या जातीचा बकरा खूप कमी बघायला मिळतो, अशातच त्याला बघण्यासाठी गर्दी होणं साहजिकच आहे. कोरोनाच्या संकटादरम्यान धान्य, भाज्या, फळंच नाही तर बकरे सुद्धा ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

दीड कोटीहून अधिक आहे किंमत

या ८ फूटाच्या बकऱ्याची किंमत ऐकून आपणही आश्चर्यचकित व्हाल. अनेक गुणांनी युक्त असलेल्या या बकऱ्याला भिलाईच्या फरीद नगर इथले राहणारे आई अहमद उर्फ लाल बहादुर मलिक यांनी खरेदी केलं आहे. ज्याची किंमत १ लाख त्रेपन्न हजार रुपये आहे. (१.५३ लाख रुपये). एव्हढंच नव्हे तर १४८ किलोच्या या बकऱ्याला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात म्हणजे पंजाबमधून भिलाईला आणण्यासाठी २३ हजार रुपयांचा खर्च आला आहे.

बकऱ्याचं वैशिष्ट्ये असं आहे की, बकरा गवतासोबतच भाज्या आणि फळ-फूलं पण चवीनं खातो. आपल्याला माहितीय की, देशातील काही भागांमध्ये लोकांना आरोग्यासंबंधी सूचना देऊन मस्जिदमध्ये ईदच्या दिवशी नमाज पठण करण्याची परवानगी दिली आहे. पण लोकांना मास्क घालणं आवश्यक असेल.


आपल्याला माहितीच आहे देशात कोरोना संकटामुळे यावर्षी सर्वच सण आपआपल्या घरी साजरे करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. शिवाय गणेशोत्सव पण अगदी साध्या प्रमाणात साजरा करण्यास सरकारनं सांगितलंय. तसंच आता बकरी ईद सुद्धा संपूर्ण काळजी घेऊन साजरा करण्यास सरकारनं सांगितलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी