[Vidoe]: पाहा व्हिडिओ; चिमुकलीने जवानाला सॅल्युट करत केले आभार व्यक्त

व्हायरल झालं जी
Updated Aug 12, 2019 | 18:53 IST | टाइम्स नाऊ हिंदी

[Vidoe]: पुरात अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी लष्कर, एनडीआरएफ, नौदलाला पाचारण करण्यात आलं. गेले आठ दिवस या जवानांनी पूरग्रस्त भागात बचावकार्य आणि मदतकार्य केलंय. जवानांनी केलेल्या कामचे कौतुक होताना दिसत आहे.

girl salute army man
पूरग्रस्त भागातील चिमुकलीने केला जवानाला सॅल्युट  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • सातारा, सांगली, कोल्हापुरात अद्यापही पूरस्थिती; अनेकांची स्थलांतर
  • पूर ओसरण्याची गती धिमी; जवानांच्या बचावकार्याचे सर्वच स्तरांतून कौतुक
  • सोशल मीडियावर जवानांचे अनेक व्हिडिओ झाले व्हायरल

पुणे : महाराष्ट्रासह गुजरात, केरळ आणि कर्नाटकमध्ये सध्या महापुराने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील काही गावे शंभर टक्के पाण्याखाली गेली आहेत. अनेक गावांना अद्यापही कृष्णा पंचगंगेच्या पुरानं वेढलं आहे. परिणामी पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कर, एनडीआरएफ, नौदलाला पाचारण करण्यात आलं. गेले आठ दिवस या जवानांनी पूरग्रस्त भागात बचावकार्य आणि मदतकार्य केलंय. जवानांनी केलेल्या या अथक बचावकार्याचे ठिकठिकाणी कौतुक होत आहे. कोल्हापुरात या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांचा कोल्हापूर पद्धतीने सत्कार करण्यात आला. तर, सांगलीत महिलांनी या जवानांना राख्या बांधून त्यांच्याशी बंधुत्वाचे नाते जोडले. या प्रसंगांचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर होताना दिसत आहेत. त्यात एका चिमुकलीचाही व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या चिमुकलीने उभ्या असलेल्या जवानाला ‘आप बहोत अच्छा काम करते हो’ असे म्हणत सॅल्युट केला आहे. हा व्हिडिओ कोठे शूट करण्यात आला आहे आणि त्या चिमुकलीचे नाव काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

'आप बहुत अच्छा काम करते हो'

दक्षिण भारतात सध्या अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली येथे तर पुराने कहर केला आहे. याच परिसरात बचावकार्यात सहभागी झालेल्या जवानाला एका चिमुकलीने सॅल्युट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'आप बहुत अच्छा काम करते हो'। असं म्हणत तिनं तिच्याच शब्दांत जवानाला त्याच्या कामाची पोहोच पावती दिली आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रामाणावर शेअर होत असून, त्याला २५ हजारहून अधिक जणांनी लाईक केले आहे. महाराष्ट्रात पुराच्या तडाख्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

 

 

शिरोळ तालुक्यात गंभीर स्थिती

पुणे विभागात सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील मृतांची संख्या २९वर पोहोचली आहे. अजूनही सहाजण बेपत्ता आहेत. पुणे विभागातील २ लाख ८५ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. अजूनही कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. शिरोळ तालुक्यात पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम असल्यामुळे तेथे पूरस्थिती अधिक गंभीर आहे. दोन दिवसांपूर्वी गुजरातमध्ये दोन मुलींना खांद्यावर घेऊन चालत जाणाऱ्या एका पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुलींना खाद्यावर घेऊन त्या पोलिसाने पुराच्या पाण्यातून मोठे अंतर पार केले होते. त्या पोलिसाचे सोशल मीडियावर कौतुक होत असून, त्याला सुपरमॅन तसेच हनुमानाची उपमा देण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
[Vidoe]: पाहा व्हिडिओ; चिमुकलीने जवानाला सॅल्युट करत केले आभार व्यक्त Description: [Vidoe]: पुरात अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी लष्कर, एनडीआरएफ, नौदलाला पाचारण करण्यात आलं. गेले आठ दिवस या जवानांनी पूरग्रस्त भागात बचावकार्य आणि मदतकार्य केलंय. जवानांनी केलेल्या कामचे कौतुक होताना दिसत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...