'अभिनंदन'चं हे मिम सोशल मीडियात व्हायरल

व्हायरल झालं जी
Updated Jun 17, 2019 | 22:29 IST | टाइम्स नाऊ हिंदी

वर्ल्ड कप मॅचमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि संपूर्ण देशात त्याचं सेलिब्रेशन झालं. तर, सोशल मीडियात मिम्सच्या माध्यमातून पाकिस्तानच्या पराभवाची खिल्ली उडवली जात आहे.

kolkata police shares meme abhinandan after India vs Pakistan
'अभिनंदन'चं हे मिम सोशल मीडियात व्हायरल  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: वर्ल्ड कपमधील 22वी मॅच टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या दोन प्रतिस्पर्धी संघांमध्ये रविवारी मॅच झाली. या मॅचमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 89 रन्सने पराभव केला आणि आपली विजयी घोडदौड कायम राखली. यासोबतच आतापर्यंतच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला भारताने सातव्यांदा पराभूत केलं आहे. टीम इंडियाने मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियात पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडिया युजर्स जोक्स आणि मिम्सच्या माध्यमातून पाकिस्तानची टर उडवली जात आहे.

याच दरम्यान कोलकाता पोलिसांनी एक मिम ट्विटरवर शेअर केलं आहे. कोलकाता पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मिम असल्याचं दिसत आहे. या मिममध्ये एक फोटो असून त्यामध्ये पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन सरफराज अहमद हा टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याला प्रश्न विचारत आहे की, तुम्ही प्रत्येकवेळी कसे काय जिंकता? या प्रश्नावर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा उत्तर देताना म्हणतो की, मी याबाबत तुम्हाला काहीही सांगू शकत नाही.

या ट्विटमधील फोटोमध्ये बंगाली भाषेत भारतीय विंग कमांडर अभिनंदन याचं नाव लिहिण्यात आलं आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचपूर्वी पाकिस्तानने एक जाहिरात दाखवली होती ज्यामध्ये विंग कमांडर अभिनंदन यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता हे मिम म्हणजे पाकिस्तानच्या त्या व्हिडिओला प्रत्युत्तर असल्याचं बोललं जात आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील मॅचपूर्वी पाकिस्तानमध्ये एक जाहिरात बनवण्यात आली. या जाहिरातीमध्ये विंग कमांडर अभिनंदन यांच्या सारखा दिसणारा एक व्यक्ती टीम इंडियाच्या जर्सीत दाखवण्यात आला आहे. 

व्हिडिओत त्या व्यक्तिला विचारण्यात येतं की, टॉस जिंकणार तर काय करणार?, टीम कशी असणार? यावर निळ्या जर्सीत असलेला व्यक्ती म्हणतो, मी तुम्हाला या संदर्भात काहीही सांगू शकत नाही. त्यानंतर त्याला विचारण्यात येतं की, चहा कसा आहे? त्यावर तो म्हणतो खूपच चांगला आहे. तसेच अभिनंदन यांना मॅचच्या रणनितीविषयी विचारण्यात आलं आणि त्यावर उत्तर न मिळाल्याने कप कुठे घेऊन चालला आहेस असा प्रश्न विचारण्यात आला आहे. या व्हिडिओतून पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांची एक प्रकारे खिल्लीच उडवली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
'अभिनंदन'चं हे मिम सोशल मीडियात व्हायरल Description: वर्ल्ड कप मॅचमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि संपूर्ण देशात त्याचं सेलिब्रेशन झालं. तर, सोशल मीडियात मिम्सच्या माध्यमातून पाकिस्तानच्या पराभवाची खिल्ली उडवली जात आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola