लेडी डॉक्टरच्या प्रेमात पडला चिमुकला पेशंट, लाखो नेटिझन्सनी बघितलेला Video तुम्ही पाहिला का?

Lady Doctor Was Checking Kid And He Gave Lovely Expression : चिमुकल्याच्या लेडी डॉक्टरविषयीच्या निःस्वार्थ प्रेमाचा छोटेखानी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Lady Doctor Was Checking Kid And He Gave Lovely Expression
Viral Video : लेडी डॉक्टरच्या प्रेमात पडला चिमुकला पेशंट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Viral Video : लेडी डॉक्टरच्या प्रेमात पडला चिमुकला पेशंट
  • लाखो नेटिझन्सनी बघितलेला Video तुम्ही पाहिला का?
  • चिमुकल्याच्या लेडी डॉक्टरविषयीच्या निःस्वार्थ प्रेमाचा छोटेखानी व्हिडीओ

प्रेम आंधळं असतं. कोणाला कधी कोणाविषयी प्रेम वाटेल याचा काही नेम नाही. काही जण प्रेमाच्या शोधात वेड्या सारखे भटकत राहतात. तर काहींना सहज प्रेम होऊन जाते. प्रेमाला वय, पैसा, स्त्री-पुरुष असा कोणीतीही मर्यादा नाही. माणूस एकदा प्रेमात पडला की त्याला दुसरं काही सुचत नाही. मग त्या व्यक्तीचं सगळं जगच बदलून जातं. ( Lady Doctor Was Checking Kid And He Gave Lovely Expression ) । व्हायरल झालं जी

निरागस चिमुरड्यांची कथा काही वेगळी नाही. ते तर चटकन कोणाच्याही प्रेमात पडतात. कोणाही सोबत आनंदाने खेळतात. कोणावरही लवकर विश्वास ठेवतात. याच कारणामुळे असेल पण एक चिमुरडा पेशंट त्याला तपासणाऱ्या लेडी डॉक्टरच्या प्रेमात पडला. त्याच्या प्रेमाची ही सुंदर गोष्ट व्हिडीओ रुपाने सोशल मीडियावर बघण्यासाठी उपलब्ध आहे. निरागस चिमुकल्याचे त्याच्या लेडी डॉक्टरवरील निःस्वार्थ प्रेम पाहून अनेकांना प्रेम ही भावना नव्याने कळली. सोशल मीडियावरील चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि आतापर्यंत लाखो नेटिझन्सनी बघि आहेतला.

व्हिडीओत लेडी डॉक्टर चिमुकल्या पेशंटला तपासत असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला आपल्याला तपासणारी ही व्यक्ती कोण या उत्सुकतेपोटी शांतपणे चिमुकला लेडी डॉक्टरकडे बघत असल्याचे दिसते. स्टेथास्कोपने तपासताना लेडी डॉक्टर हळूच बाळाला गुदगुल्या करते आणि त्याला हसविण्याचा प्रयत्न करते. बाळ लेडी डॉक्टरच्या कृतीने सुखावते. मग काय तपासत असलेल्या लेडी डॉक्टरच्या हातावर स्वतःचं डोकं ठेवून शांत विसावते. 

चिमुकल्याच्या लेडी डॉक्टरविषयीच्या निःस्वार्थ प्रेमाचा हा छोटेखानी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो नेटिझन्सनी व्हिडीओ बघितला आणि त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी