Baby Borned In Mcdonald's Bathroom : नवी दिल्ली : माणसाचा जन्म ही एक अद्भूत गोष्ट असते. नऊ महिने पोटात बाळ सांभाळत आणि प्रसूती कळांना तोंड देत एखादी महिला जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा निसर्गाची एक अद्भूत प्रक्रिया पार पडलेली असते. बाळांतपणानंतर त्या महिलेचा एकप्रकारे पुनर्जन्मच होतो असे म्हणतात ते काही उगाच नाही. सर्वसाधारणपणे बाळांतिणीला (Pregnant lady) वेदना सुरू झाल्यानंतर किंवा त्यापूर्वीच हॉस्पिटलमध्ये नेले जाते आणि मग तिथे प्रसूतीची क्रिया पडते. मात्र काहीवेळा अशी परिस्थिती उद्भवते की हॉस्पिटलऐवजी इतरत्रच प्रसूती पार पडते. बाळाच्या जन्माची अशी अनेक विचित्र प्रकरणे समोर येत असतात. या प्रक्रियेतील गुंतागुत लक्षात घेता आपण ती ऐकून थक्कदेखील होत असतो. कधी ट्रॅफिकमध्ये रस्त्याच्या कडेला जन्म झाल्याची घटना घडते, तर कधी इतर ठिकाणी ही घटना घडते. मात्र आता निसर्गाची कमाल (Nature's magic) म्हणजे चक्क एका बाथरुममध्येच एका महिलेची प्रसूती पार पडली आहे. विशेष म्हणजे हे बाथरुम चक्क मॅकडोनाल्डचे ( Mcdonald's Bathroom)आहे. एका विशिष्ट परिस्थितीत मॅकडोनाल्डच्या बाथरूममध्ये एका महिलेला आपल्या मुलाला जन्म (Baby borned in Mcdonalds Bathroom) द्यावा लागला. कारण तिला त्या बाथरूममध्ये पोचताच प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि मग पुढे ही सर्व क्रिया पाडली. (Lady gave birth to baby in the bathroom of Macdonald's read in Marathi)
अमेरिकेतील अटलांटा येथील ही घटना आहे. न्यूयॉर्क पोस्टमध्ये आलेल्या माहितीनुसार या गर्भवती महिलेचे नाव अलेंड्रिया वर्थ आहे. मागील आठवड्यात ती आपल्या पतीसोबत हॉस्पिटलमध्ये जात होती. त्याचवेळी वाटेत ती एका मॅकडोनाल्डच्या आउटलेटमध्ये विश्रांतीसाठी थांबली. त्याचवेळी महिलेच्या प्रसूती वेदना अचानक वाढल्या. या वेदना इतक्या जास्त होत्या कीत्या महिलेने जोरजोरात आरडाओरडा केला.
अधिक वाचा - Garlic Benefits in Winter: हिवाळ्यात असे करा लसणाचे सेवन...अनेक आजार पळतील दूर
महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू होताच तिच्या पतीने मॅकडोनाल्डच्या व्यवस्थापकाला याची माहिती दिली. ती मॅनेजर स्वतः एक महिला होती. ती बाथरूममध्ये पोचल्यावर तिला धक्काच बसला. ती महिला बाथरूममध्ये रडत होती. परिस्थिती लक्षात घेऊन त्या मॅनेजरने ताबडतोब बाकीच्या सहकाऱ्यांना बोलावून मदत केली. सुदैवाने तिथेच एका मुलीचा जन्म झाला. या सर्व प्रकारात मॅकडोनाल्डच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी मदत केली.
अधिक वाचा : व्हॉट्सअॅपने लॉंच केले एक नवीन धमाल फीचर, स्वत:ला मेसेज करा
समोर आलेल्या माहितीनुसार इतक्या कठीण परिस्थितीत त्या महिलेने जेव्हा एका मुलीला जन्म दिला तेव्हा सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला होता. कोणतीही वैद्यकीय सुविधा नसताना हे बाळंतपण पार पडले होते. आता मॅकडोनाल्डच्या बाथरुममध्येच त्या मुलीचा जन्म झाल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांनी तिचे नाव लिटल नगेट असे ठेवले. नगेट ही एक प्रकारची डिश असून ती मॅकडोनाल्डमध्ये मिळते. त्यावरूनच हे नामकरण करण्यात आले.