घरमालक भाडे कमी करण्यासाठी मागत होता महिलेचे 'ही गोष्ट', महिलेसोबत चॅट व्हायरल 

एका २२ वर्षीय महिला जी आपल्यासाठी एक घर भाड्याने शोधत होती, तिच्याशी एक व्यक्ती चॅट करतो. पण तिच्याकडे अशी मागणी केली, जे वाचून तुम्हांला धक्का बसेल. 

landlord tells girl to send topless photos for reduced rent chat goes viral crime news in marathi
घरमालक भाडे कमी करण्यासाठी मागत होता महिलेचे 'ही गोष्ट', महिलेसोबत चॅट व्हायरल   |  फोटो सौजन्य: फेसबुक

नवी दिल्ली :  एका घरमालकाचे व्हॉट्सअॅप चॅट सध्या व्हायरल होत आहे. यात घराचे भाडे कमी करण्याच्या बदल्यात त्याने केली अशी मागणी जी ऐकून तुम्ही हैराण व्हाल. २२ वर्षीय एक महिला आपल्यासाठी एक घर भाड्याने शोधत होती. या दरम्यान, तिच्या संपर्कात एक व्यक्ती आला. त्याने तिला रिकाम्या घराबद्दल सांगितले. या नंतर महिलेने त्याच्याशी भाड्याबाबत चर्चा केली. त्यानंतर घरमालकाने अशी मागणी केली की महिलेला धक्काच बसला. 

हे प्रकरण इंग्लंडच्या कॅंटरबर कँटचे आहे. २२ वर्षीय जॉर्जियाने घरमालकाला घराच्या भाड्याबद्दल विचारले त्यावर त्याचे उत्तर होते. की तुम्ही जर काही मागणी पूर्ण कराल तर भाडे कमी होऊ शकते. त्यावर तरूणीने विचारले काय करावे लागेल. तर घऱ मालकाने म्हटले जर तू दोन टॉपलेस (न्यूड) फोटो पाठवल्यास दर महिन्याला २०० पाऊंड (१८००० रुपयांपेक्षा अधिक) कमी भाडे द्यावे लागेल. 

घऱ मालकाने पहिल्या चॅटमध्ये जॉर्जियाला ऑप्शन देताना म्हटले की, एक पर्याय आहे की तू भाडे कमी करू इच्छित आहे. त्याला उत्तर देताना जॉर्जियाने लिहिले की खरंच असं काही होऊ शकत? घर मालकाने सांगितले माझ्याकडे एक मॉडेलिंग कंपनी आहे. माझे काही भाडेकरू माझ्यासाठी काही काम करतात. जर तू दोन न्यूड फोटो पाठवले तर तुझे भाडे २०० पाऊंडने कमी होऊ शकते. 

यानंतर जॉर्जियाने या घर मालकाच्या ऑफरला रिजेक्ट करून त्याच्यासोबत झालेले स्क्रीन शॉट सोशल मीडियावर पोस्ट केले. जॉर्जिया म्हणते, मला वाटले ही मस्करी आहे. पण मला वाटते हे खतरनाक संकेत आहेत. काही लोक इंटरनेटवर किती खतरनाक होतात. विशेष करून युवा आणि कमकुत महिलासाठी. हे स्पष्ट होते की महिलांसाठी किती जगणे कठीण आहे. एकटे राहिल्यावर लोक लैंगिक छळ करण्याचे प्रयत्न करतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...