Landslide in heavy rain: पर्यटकांच्या गाडीवर कोसळली दरड; हिमालच प्रदेशातील घटनेचा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

Landslide in tourist car, incident caught in CCTV: मुसळधार पावसात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. पर्यटकांच्या गाडीवर दरड कोसळल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

landslide in himachal pradesh kasauli area rock falls on tourist car caught in cctv video goes viral
पर्यटकांच्या गाडीवर कोसळली दरड; हिमालच प्रदेशातील घटनेचा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO 
थोडं पण कामाचं
  • पर्यटकांच्या गाडीवर कोसळली दरड 
  • घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
  • हिमाचल प्रदेशातील कसौली येथील घटना

हिमाचल प्रदेश : महाराष्ट्र, गुजरातसह हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता हिमाचल प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसात भूस्खलन झाल्याने दरड कोसळून दुर्घटना (landslide in Himachal Pradesh) घडली आहे. दरड कोसळून थेट पर्यटकांच्या गाडीवर मोठे दगड आल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एका टेकडीच्या शेजारी पार्क असलेल्या गाड्यांवर मोठ-मोठे दगड कोसळत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

हा व्हायरल झालेला व्हिडिओ सोलन जिल्ह्यातील कसौली येथील असल्याचं बोललं जात आहे. हिमाचल प्रदेशात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाडीवर ही दरड कोसळली. भलेमोठे दगड गाडीवर पडल्याने गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाल्याचं दिसून येत आहे.

पंजाबमधील नोंदणी असलेल्या गाडीवर दरड कोसळल्याचं व्हिडिओत दिसत आहे. ही गाडी पंजाबमधील पर्यटकांची होती, जे कसौली येथे पर्यटनासाठी आले होते. हे पर्यटक आपली गाडी पार्क करुन एका हॉटेलमध्ये गेले होते आणि त्याच दरम्यान त्यांच्या गाडीवर ही दरड कोसळली. दरड कोसळल्याने गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाहीये.

हे पण वाचा : खेळता-खेळता इमारतीच्या ११व्या मजल्यावरुन ५ वर्षीय चिमुकला खाली कोसळला, मुंबईतील ह्रदयद्रावक घटना

हवामान विभागाकडून यल्लो अलर्ट

व्हिडिओत दिसत आहे की, एका टेकडीच्या शेजारील रस्त्यावर गाड्या पार्क करण्यात आल्या आहेत. त्याच दरम्यान दरड कोसळते आणि एक-एक करुन दगड खाली कोसळू लागले. सुरुवातीला लहान दगड कोसळतात आणि त्यानंतर मोठे दगड कोसळत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. हिमाचल प्रदेशात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. त्यातच आता स्थानिक हवामान विभागाने १४ जुलैपर्यंत हवामान अशाच प्रकारे राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर सतत होत असलेल्या या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तसेच नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी