Leave Application: 'मास्साब दो दिन से चढ रओ है जो बुखार' या थाटातील विद्यार्थ्याचा मजेशीर बुंदेलखंडी अर्ज वाचून व्हाल हसून हसून वेडे

Viral Post : शाळेत अर्ज पाठवण्याची पद्धत आहे. आपण सर्वांनी असे अर्ज केव्हा ना केव्हा लिहिलेले असतात. या अर्जांमध्ये काहीवेळा थापादेखील मारल्या जातात. अर्थात अर्ज किंवा पत्र लिहिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, अर्जाची भाषा कशी असली पाहिजे इत्यादी गोष्टी आपल्याला शाळेतच शिकवलेल्या देखील असतात. बुंदेलखंडातील एका शाळकरी विद्यार्थ्याच्या सुट्ट्यीच्या अर्जाने सोशल मीडियाच्या युजर्सना आणि नेटिझन्सना हसवून लोटपोट करून टाकले आहे.

Viral post
व्हायरल पोस्ट 
थोडं पण कामाचं
  • शाळेत अर्ज पाठवण्याची एक पद्धत असते
  • आयएएस अधिकारी असलेल्या अर्पित वर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला एक भन्नाट अर्ज
  • बुंदेलखंडच्या शाळकरी मुलाचा सुट्टीचा अर्ज झाला व्हायरल, युजर्स हसून लोटपोट

Leave Application by school student:नवी दिल्ली : शाळेत जाणारे विद्यार्थी वेगवेगळ्या कारणांमुळे गैरहजर राहतात किंवा सुट्ट्या घेतात. अशावेळी शाळेत अर्ज पाठवण्याची पद्धत आहे. आपण सर्वांनी असे अर्ज (Leave Application) केव्हा ना केव्हा लिहिलेले असतात. या अर्जांमध्ये काहीवेळा थापादेखील मारल्या जातात. अर्थात अर्ज किंवा पत्र लिहिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, अर्जाची भाषा कशी असली पाहिजे इत्यादी गोष्टी आपल्याला शाळेतच शिकवलेल्या देखील असतात. काहीवेळा घरातील पालकांनी किंवा वडीलधाऱ्यांनीदेखील त्या शिकवलेल्या असतात. मात्र काही लोकांची गोष्टच वेगळी असते. ते आपल्याच पद्धतीने संवाद साधतात. अर्ज लिहिताना ते प्रचलित भाषा किंवा पद्धत न वापरता आपल्याच शैलीत लिहितात आणि मग एक धमाल उडवून देतात. असाच एक अर्ज सध्या जबरदस्त व्हायरल (Viral Leave Application)होतो आहे. हा अर्ज एका शाळकरी विद्यार्थ्याचा आहे. या अर्जाने सोशल मीडियाच्या युजर्सना आणि नेटिझन्सना हसवून लोटपोट करून टाकले आहे. आयएएस अधिकारी असलेल्या अर्पित वर्मा यांनी ट्विटरवर हा अर्ज शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की हा विद्यार्थी बुंदेलखंडचा (Bundelkhand leave application) असून त्याच्या देशी भाषेने लोकांची मने जिंकली आहेत. काय आहे हा अर्ज ते पाहूया. (Leave application by Bundelkhand school student goes viral)

अधिक वाचा : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर 50 कोटींचे हेरॉइन जप्त, 2 अटकेत

विद्यार्थ्याचा सुट्टी मागण्याचा देशी अंदाज

हा अर्ज सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. आयएएस अधिकारी असलेल्या अर्पित वर्मा यांनी तो ट्विटरवर शेअर केला आहे. या ट्विटनुसार हा अर्ज कलुआ नावाच्या विद्यार्थ्याने लिहिलेला असल्याचे दिसतो. बहुदा अर्ज लिहिणारा विद्यार्थी उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडातील असावा. कारण अर्जाची भाषा तीच आहे. आपल्या बुंदलेखंडी पद्धतीने विद्यार्थी त्याच्या आजारपणाचे वर्णन करत शाळेतून सुट्टी मागतो. आपल्या सुट्टीच्या अर्जामध्ये कलुआने लिहिले आहे, 'तो मस्साब ऐसा है की दो दिन से चड रओ है जो बुखार उपर से जा नाक बह रई सो अलग. जई के मारे हम सकूल नई आ पाई सो तमाए पाऊ पर के निवेदन आए कि दो-चार दिना कि छुट्टी दे देते तो बड़ो अच्छो रहतो.' इतकेच नाही अर्जाच्या शेवटी तर या विद्यार्थ्याने कहरच केला आहे. अर्जाचा शेवट अत्यंत मजेशीर पद्धतीने होतो. यात विद्यार्थ्याने लिहिले की, 'भले ही मैं स्कूल आऊं या न आऊं, कौन सा स्कूल बंद हो जाएगा. आपका कलुआ.'

अधिक वाचा : आम्हीच या परिसराचे भाई म्हणत केला गोळीबार, पुण्यात धक्कादायक घटना

अर्जावर प्रतिक्रियांचा पाऊस 

ट्विटरवरील ही पोस्ट पाहिल्यानंतर लोकांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोस्टला 10 हजार लाइक्स आणि भरपूर प्रतिक्रिया मिळाल्या. हा अर्ज इतका मजेशीर आणि भन्नाट आहे की वाचल्यानंतर लोकांना हसू आवरणे कठीण झाले आहे. भविष्यात रजेसाठी अर्ज करताना ते अर्जाचे अरसेच टेम्पलेट वापरतील अशीही प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. एका यूजरने तर लिहिले आहे की, 'वाह जी वाह क्या गजब पंच मारा है'. तर दुसर्‍या यूजरने लिहिले आहे की, 'कलुआ सही कह रओ है, ऊके ना आये से कौन स्कूल बंद हो जे है.' आणखी एका युजरने लिहिले, 'इत्तो जोक ना उडाओ सर जी हमे बुंदेलखंड को.' याप्रमाणाचे इतर अनेक युजर्सनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात बुंदेलखंडच्या युजर्सनी त्यांची भाषा वाचून आनंद झाल्याचे म्हटले आहे. 

अधिक वाचा :  Lalu Prasad Yadav Mimicry: लालू प्रसाद यादवांची ‘ही’ मिमिक्री पाहिली का? तेजप्रतापही झाले थक्क

सोशल मीडियाच्या जमान्यात एखादी गोष्ट व्हायरल होण्यासाठी वेळ लागत नाही. मग ती एखादी घटना असो, बातमी असो की व्हिडिओ. सोशल मीडियावर हा अर्ज  व्हायरल झाल्यानंतर युजर्स यावर तुफान प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियाच्या जमान्यात कोणतीही बातमी किंवा व्हिडिओ जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पोचण्यास वेळ लागत नाही. अशा चाकोरीबाहेरच्या गोष्टी लगेच सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधून घेत असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी