Leopard Jump Video : माकडाच्या शिकारीसाठी बिबट्याची अनोखी उडी, VIDEO पाहून सगळेच थक्क

बिबट्या झाडावर चढला. समोरच्या फांदीवर होतं माकडाचं पिल्लू. बिबट्याने सर्व ताकद एकवटून आणखी एक झेप घेतली. मात्र त्याचा अंदाज चुकला आणि तो पुन्हा जमिनीवर पडला.

Leopard Jump Video
माकडाच्या शिकारीसाठी बिबट्याची अनोखी उडी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बिबट्याने मारली झाडावरून उडी
  • माकडाच्या पिल्लाची शिकार करण्याचा प्रयत्न
  • व्हिडिओ होतोय व्हायरल

Leopard Jump Video | बिबट्या हा प्रचंड ताकद आणि चपळता असलेला प्राणी म्हणून ओळखला जातो. शिकार करण्याची त्याची पद्धत ही विलक्षण असून सावज पकडण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. कधी पाठलाग करून, कधी बेसावध असताना हल्ला करून तर कधी त्याच्या अंगावर अचानक झडप घालून बिबटे आपली शिकार करत असतात. बिबट्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ यापूर्वीदेखील समोर आले आहेत. मात्र नुकताच समोर आलेला एक व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

बिबट्याची जोरदार उडी

या व्हिडिओत एक बिबट्या माकडाच्या पिल्लाची शिकार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं. त्यासाठी हा बिबट्या झाडावर चढला आहे. बिबट्याच्या वजनानं झाडाची फांदी हलते आहेत आणि ही फांदी कधीही मोडून पडेल, असं वाटतं. मात्र तरीही आपला तोल सांभाळत बिबट्या उंच झाडावर चढला असून माकडाच्या पिल्लावर झडप घालण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसतं. काही क्षणांतच तो आपलं सावज पकडण्यासाठी झेप घेतो. झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर वरच्या दिशेनं बिबट्या झेपावतो मात्र त्याला तोल जातो आणि तो खाली पडतो. 

जमिनीवर पायांनी जोर देऊन उडी मारण्याची सवय बिबट्यांना असते. जमिनीवर दिलेल्या दाबामुळेच लांब आणि उंच झेप घेणं बिबट्यांना शक्य होतं. मात्र झाडावरून झेप घेताना बिबट्याला कदाचित तेवढा जोर मिळाला नाही. झेप घेताना बिबट्याच्या वजनामुळे झाडाची फांदी वाकली आणि त्यामुळे बिबट्याचा अंदाज चुकला असावा, अशी चर्चा आहे. झेप मारल्यानंतर काही अंतर वरच्या दिशेनं जाऊन बिबट्या झाडावरून थेट जमिनीवर कोसळल्याचं या व्हिडिओत दिसतं. 

अधिक वाचा -  Viral Video : दोन सापांची लढाई, एकाने दुसऱ्याला गिळले

दुर्मिळ व्हिडिओ

हा व्हिडिओ अत्यंत दुर्मिळ असल्याची चर्चा आहे. बिबट्याच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होत असतात. मात्र झाडावर चढून झेपावणारा बिबट्या सहसा पाहायला मिळत नाही. ही झेप घेतल्यानंतर माकडाचं पिल्लू त्याला मिळालं की नाही, हे व्हिडिओतून स्पष्ट होत नाही. हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्यांच्या संभाषणातून मात्र बिबट्याने माकडाला पकडलं असावं, अशी शक्यता ऐकू येते. मात्र खऱोखरच त्याने माकडाच्या पिल्लाची शिकार करण्यात यश मिळवलं की नाही, हे व्हिडिओतून स्पष्टपणे समजू शकत नाही. मात्र बिबट्याने अशा प्रकारे झाडावर चढून उडी मारल्याचा हा दुर्मिळ व्हिडिओ एक वेगळाच अनुभव प्राणीप्रेमींना देतो. 

अधिक वाचा -  Horror Video : घनदाट जंगलात कारमधून उतरली महिला, वाघाने हल्ला करून नेलं पळवून, हा भयंकर व्हिडिओ पाहून उडेल काळजाचा थरकाप

व्हिडिओ होतोय व्हायरल

बिबट्याने झाडावरून उडी मारून शिकारीचा प्रयत्न केल्याचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. वन्यजीवप्रेमींनी या व्हिडिओला जोरदार प्रतिसाद दिला असून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी