पर्यटकांनी बघितला शिकारीचा लाइव्ह थरार, व्हिडीओ व्हायरल

Lion ambushes his prey right in front of safari tourists जंगल सफारीवर निघालेल्या पर्यटकांना एक अनपेक्षित असा अनुभव आला. त्यांना शिकारीचा लाइव्ह थरार स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवण्याची संधी मिळाली.

Lion ambushes his prey right in front of safari tourists
पर्यटकांनी बघितला शिकारीचा लाइव्ह थरार, व्हिडीओ व्हायरल 

थोडं पण कामाचं

  • पर्यटकांनी बघितला शिकारीचा लाइव्ह थरार, व्हिडीओ व्हायरल
  • वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला व्हिडीओ
  • लाखो युझरनी बघितला व्हिडीओ

नवी दिल्ली: जंगल सफारी हा एक अनोखा अनुभव असतो. अनेक पर्यटक वाघ, सिंह यांना जवळून बघण्याची संधी म्हणून जंगल सफारीवर जातात. अशाच एका जंगल सफारीवर निघालेल्या पर्यटकांना एक अनपेक्षित असा अनुभव आला. त्यांना शिकारीचा लाइव्ह थरार स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवण्याची संधी मिळाली. पर्यटकांच्या डोळ्यांसमोर एका सिंहाने जंगलात शिकार केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत २० लाखांपेक्षा जास्त सोशल मीडिया युझरनी हा व्हिडीओ बघितला आहे. Absolutely Nuts! Lion ambushes his prey right in front of safari tourists, video gets 2 million views [WATCH]

जंगल सफारीत अनेक प्राणी आणि पक्षी जवळून बघण्याची संधी मिळते. पण वाघ, सिंह जवळ असले तरी दिसतीलच याची खात्री नसते. अनेकदा वाघ, सिंह यांच्यासारखे आक्रमक प्राणी गुहेत किंवा एखाद्या आडोश्याच्या अथवा घनदाट झाडे असलेल्या ठिकाणी आराम करत असतात. अथवा एखाद्या ठिकाणी दबा धरुन शिकार करण्यासाठी संधीची वाट बघत असतात. जंगल सफारीच्या वाहनातून पर्यटकांना सुरक्षेच्या कारणास्तव उतरण्याची परवानगी अनेकदा दिली जात नाही. यामुळे जंगल सफारीच्या वाहनातून वाघ, सिंह सहजतेने दिसतीलच याची खात्री देणे कठीण असते. पण काही वेळा पर्यटकांच्या नशिबाने त्यांना वाघ, सिंह अशा आक्रमक प्राण्यांचे दर्शन होते. वाघ किंवा सिंह दिसले तरी ते शिकार करत असतानाचा थरार अनुभवण्याची संधी ही अतिशय दुर्मिळ आहे. याच कारणामुळे पर्यटकांनी जवळून बघितलेला शिकारीचा लाइव्ह थरार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Absolutely Nuts! Lion ambushes his prey right in front of safari tourists, video gets 2 million views [WATCH]

जंगल सफारीवर निघालेल्या वाहनाच्या प्रशिक्षित चालकाला जंगलात जवळच सिंह आहे याची जाणीव झाली आणि त्याने वाहन थांबवले. पर्यटक त्यांच्या डोळ्यांनी सिंहाला शोधत होते; त्याचवेळी झाडांच्या आडून एक प्राणी वेगाने धावत पुढे आला. या प्राण्याच्या अंगावर झडप घालण्याच्या निमित्ताने सिंह पुढे आला. सिंहाने पर्यटकांच्या डोळ्यांसमोरच झडप घालून शिकार साधली. ही घटना जंगल सफारीच्या वाहनाजवळ घडल्यामुळे पर्यटकांना स्वतःच्या डोळ्यांनी शिकारीचा थरार अनुभवण्याची संधी मिळाली. जंगल सफारीला निघालेल्यांपैकी एकाने या घटनेचा व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर अपलोड केला. शिकारीचा लाइव्ह थरार दर्शविणारा हा व्हिडीओ व्हायरल झाला. आतापर्यंत वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लक्षावधी नागरिकांनी हा व्हिडीओ बघितला. व्हिडीओ बघणाऱ्या अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 

शिकारीचा लाइव्ह थरार बघणारे पर्यटक तसेच व्हिडीओच्या माध्यमातून शिकारीचा थरार अनुभवणारे युझर असे सर्वजण सिंहाच्या वेगवान हालचाली पाहून थक्क झाले. एरवी माणसाने केलेल्या प्रगतीच्या चर्चा अनेकदा ऐकायला मिळतात. पण सिंहाने माणसाला लक्षात येण्याआधीच वेगाने केलेली शिकार हा मती गुंग करुन टाकणारा प्रकार आहे. ज्या वेगाने आणि सफाईदारपणे सिंहाने शिकार साधली ते पाहून प्रत्यक्षदर्शी पर्यटक तसेच व्हिडीओ बघणारे सोशल मीडिया युझर चकीत झाले. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची प्रचंड चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी