lion and buffalo: जंगलातील जग जिथे एका बाजूला खूप धोकादायक वाटतं ते तितकेच रोमांचकारी आहे. जर तुम्हाला कधी जंगल सफारी करण्याची संधी मिळाली तर सुरक्षा व्यवस्थेबरोबर एकदा नक्की यात्रा करा. सोशल मीडियावर जंगला संबंधीत खूप व्हिडिओ येतात जे लोकांना खूप आवडत असतात. मग ते जंगल संस्कृतीचे असो किंवा जंगली प्राण्यांनी केलेली शिकार असो. हे सगळं लोकांना खूप आवडत आणि हेच कारण आहे की, जेव्हा शिकार संबंधीत कोणता व्हिडिओ आपल्या समोर येतो तो पाहण्यात नेटकऱ्यांना मज्जा येत असते.
सिंह आणि म्हशीची लढाई
आमच्याकडे पण असा एक व्हिडिओ आला आहे, ज्यात जंगली म्हैस आणि सिंह एकमेकांशी लढताना दिसत आहेत. wildlifemore नावाच्या हँडलनेही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. सिंह हा जंगलाचा राजा आहे, पण म्हैसही ताकदीने कमी नसते. सिंह त्याची शिकार आपल्या कळपासह करतो. सिंह आपल्या कळपामध्ये राहतो. तर दुसरीकडे म्हैस पण तिच्या कळपात राहते. आपण असा विचार करतो की म्हशीचा शिकार करण सिंहासाठी खूप सोपं आहे, पण खरंतर असं काही नाही आहे,कारण सिंहावर काही वेळेला म्हैस पण भारी पडू शकते.
अधिक वाचा : स्मार्टफोनचा युजर्स सावधान! हा App करतोय तुमची हेरगिरी
या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, सिंहांचा कळप म्हशीचा शिकार करण्यासाठी त्याच्या मागे पडले. सिंहाद्वारे म्हशीला पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. तेव्हा रागावलेल्या म्हशीने सिंहाच्या कळपावर हल्ला केला जंगलाच्या राजांना पळवून लावलं. सिंहांसमोर त्यांची शिकार होती, पण म्हैशीच्या आक्रमकतेपुढे सिंहाची हिम्मत नाही झाली.