Lion Checked Into a Hotel: एका हॉटेलमध्ये घुसली सिंहीण, पाहा भयानक व्हिडिओ 

जुनागडमध्ये एका हॉटेलमध्ये सिंह घुसतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पहा

lion checked into a hotel lion seen entering a hotel in Junagadh watch scary video
एका हॉटेलमध्ये घुसली सिंहीण, पाहा भयानक व्हिडिओ   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • सध्या, एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे,
  • जरातमधील जुनागडमधील एका हॉटेलमध्ये सिंहीण शिरल्याचे भयानक दृश्य दिसत आहे.
  •  व्हिडिओमध्ये ही सिंहीण पार्किंगमध्ये फिरताना आणि हॉटेल कॉम्प्लेक्समध्ये फिरताना दिसत आहे.

सध्या, एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यात गुजरातमधील जुनागडमधील एका हॉटेलमध्ये सिंहीण शिरल्याचे भयानक दृश्य दिसत आहे. व्हिडिओमध्ये ही सिंहीण पार्किंगमध्ये फिरताना आणि हॉटेल कॉम्प्लेक्समध्ये फिरताना दिसत आहे.  ही घटना 8 फेब्रुवारी रोजी  घडली आहे. सिंहाच्या हॉटेलमध्ये घुसल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर उदयन कच्ची या युजरने शेअर केला आहे. तीन छोट्या छोट्या व्हिडिओ सिरीजमध्ये सिंहिणीचची हालचाल हॉटेल सरोवर पोर्टिकोमध्ये दिसून येते.


सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी रेकॉर्ड केलेल्या फुटेजमध्ये सोमवारी पहाटे 5:04  वाजता मुख्य प्रवेशद्वारातून हॉटेलमध्ये प्रवेश करणारी एक एशियाटिक सिंहीण दिसली. उदयन कच्ची यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जुनागड शहरात सिंहांची घुसखोरी ही आजकाल नियमित बाब आहे. व्हिडिओमध्ये सिंहीण हॉटेलच्या सीमेवरून उडी मारताना आणि आत येताना दिसत आहे. त्याच्या केबिनमध्ये एक सुरक्षा रक्षक बसलेला दिसत आहे. हा व्हिडिओ भयानक आहे. हॉटेलच्या दुसर्‍या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये सिंह रस्त्यावरुन बाहेर पडताना दिसत आहे

तिसर्‍या व्हिडिओमध्ये सिंहीण पार्किंगमध्ये फिरताना दिसत आहे:

रस्त्यावर फिरल्यानंतर सिंहीण अनेकदा शहरात दिसतात. सिंहाने शहरात फिरल्यापासून सध्या कोणत्याही घटनेची माहिती समोर आली नाही. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतरच तेथील लोक त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत आणि सिंहाचे दृश्य शेअर करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी