Lioness in vehicle: जंगल सफारीच्या गाडीत घुसली सिंहीण, पर्यटकांना लागली चाटायला आणि मग…

बंद काचा असलेल्या गाड्यांमध्ये प्राण्यांना सहजासहजी शिरकाव करता येत नाही. मात्र सफारीसाठीच्या वाहनांमध्ये ते कधीही प्रवेश करण्याचा धोका असतो. अशाच एका गाडीमध्ये चक्क एका सिंहिणीने प्रवेश केल्याची घटना समोर आली आहे.

Lioness in vehicle
जंगल सफारीच्या गाडीत घुसली सिंहीण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जंगलातील सफारीच्या गाडीत सिंहिणीने मारली उडी
  • सिंहिणीच्या गाडीतील प्रवेशाने पर्यटकांना जबर धक्का
  • सिंहिणीने जे केले, ते पाहून अनेकांना वाटले आश्चर्य

Lioness in vehicle: जंगल सफारी (Jungle Safari) हा अनेकांच्या आवडीचा विषय असतो. जंगलात जाऊन वाघ, सिंह, हत्ती, कोल्हे, लांडगे, अस्वल यासारखे जंगली प्राणी पाहण्याचा आनंद काही औरच असतो. त्यासाठी वेगवेगळ्या अभयारण्यांमध्ये पर्यटक गर्दी करत असतात. जंगल सफारीसाठी साधारणतः जी गाडी वापरली जाते, ते छत नसलेली असते. जंगलातील झाडंझुडपं, पक्षी आणि प्राणी मोकळेपणानं पाहता यावेत, हा त्यामागचा उद्देश असतो. मात्र अशा वाहनांत अनेकदा प्राणी प्रवेश करतात आणि एकच गोंधळ उडतो. बंद काचा असलेल्या गाड्यांमध्ये प्राण्यांना सहजासहजी शिरकाव करता येत नाही. मात्र सफारीसाठीच्या वाहनांमध्ये ते कधीही प्रवेश करण्याचा धोका असतो. अशाच एका गाडीमध्ये चक्क एका सिंहिणीने प्रवेश केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

अशी घडली घटना

ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत जंगल पर्यटनासाठी काही पर्यटक एका उघड्या छताच्या गाडीतून जाताना दिसतात. या गाडीत अचानक एक सिंहीण प्रवेश करते. गाडीत सिंहीण घुसल्यानंतर पुढे काय होणार, हे आता इतर कुणाच्याही हाती नसून केवळ सिंहिणीच्या मूडवर अवलंबून असणार, हे साहजिकच असतं. गाडीत घुसल्यानंतर आता ही सिंहिण एखाद्या पर्यटकावर हल्ला करणार की त्यातील एखाद्या पर्यटकाला आपली शिकार बनवत जंगलात खेचत नेणार, असाच प्रश्न सर्वांना पडतो. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच घडत नाही. 

अधिक वाचा - Viral Wedding : तरुणीने लग्न केले सावत्र भावाशी, आई-वडिलांना तयार केले असे...लग्न झाले व्हायरल

सिंहिणीने केली चाटायला सुरुवात

घरातील एखादं पाळीव मांजर किंवा कुत्रा असावा, त्याप्रमाणे वाघिणीने गाडीतील पर्यटकांना चक्क चाटायला सुरुवात केली. एकेका पर्यटकापाशी जाऊन, त्याचा चेहरा सिंहिण चाटू लागली. आता सिंहिणीचा चेहरा आपल्या चेहऱ्यावर आल्यानंतर प्रत्येकाच्या मनात दहशत निर्माण झाली. मात्र काही क्षणांतच ही सिंहीण प्रेम करण्याच्या मूडमध्ये असल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं. त्यानंतर सर्व पर्यटकांनी तिलाही कुरवाळायला सुरुवात केली. काही सेकंदाच्या या व्हिडिओत पर्यटक मोकळेपणाने सिंहिणीला कुरवाळताना दिसत आहे. जणू अनेक वर्षांची ओळख असल्याप्रमाणे ही सिंहिण माणसाळल्याचं दिसत असून पाहणाऱ्याच्या अंगावर मात्र संभाव्य शक्यतेच्या कल्पनेने काटाच येताना दिसत आहे. 

अधिक वाचा - Ind vs Eng : इंग्लडकडून भारताच्या दारुण पराभवानंतर मीम्सचा पूर, हसून हसून दुखेल पोट

अनेकांना भरली धडकी

हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मनात भितीने धडकी भरल्याचे म्हटले आहे. सिंहीण जेव्हा गाडीत घुसली, तेव्हा ती काहीही करू शकली असती. मात्र प्रत्यक्षात तिने कुठलीही हिंसक क्रिया केली नाही. कदाचित, तिचे पोट भरलेले असावे. त्यामुळे कुठलीही शिकार करण्याच्या मूडमध्ये ती नव्हती. आपलं जंगल पाहायला आलेल्या पर्यटकांचं तिने खुल्या मनाने स्वागत केलं आणि त्यांना चाटत त्यांचा अनोखा पाहुणचार केला, अशी चर्चा रंगली आहे. ही जंगल सफारी पर्यटकांना आयुष्यभर लक्षात राहिल आणि प्रत्येकवेळी या आठवणीने त्यांच्या अंगावर काटाही येत राहिल. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी