Viral video : आपण माणसांना अनेकदा बास्केटबॉल (Basketball) खेळताना पाहिले असेल, परंतु पक्षी बास्केटबॉल (Birds Plays Basketball)चा आनंद घेत असल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? इंटरनेटवरही पक्ष्यांचे अनेक मनमोहक व्हिडिओ व्हायरल होतात, पण पक्षी बास्केटबॉल खेळतानाचे व्हिडिओ तुम्ही कधी पाहिले आहेत का? नाही तर आज आम्ही तुम्हांला दाखविणार आहे, छोट्या पक्ष्यांचा (Little Birds) एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही पक्षी बास्केटबॉल खेळताना दिसतात आणि त्यांची बास्केटबॉल खेळण्याची शैली लोकांना आवडत आहे. अमेरिकेचे माजी बास्केटबॉल खेळाडू रेक्स चॅपमन यांनी हा जबरदस्त व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
या व्हिडिओसह रेक्स चॅपमनने कॅप्शन लिहिले आहे - पक्षी बास्केटबॉल खेळताना आपण कधी पाहिले आहे का? नाही तर खालील व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे. या व्हिडिओला 28 जानेवारी रोजी शेअर करण्यात आला होता. याला आतापर्यंत 6 लाख 62 हजार 600 च्या आसपास व्ह्यूज मिळाले आहेत. , तर आतापर्यंत 5 हजार जणांनी त्याला रीट्वीट आणि 1 8 हजार 800 लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ वारंवार पाहिला जात आहे
या व्हिडिओमध्ये पाच लहान पक्षी दिसत आहेत आणि त्यांच्यामध्ये बास्केटबॉल सामना चालू आहे. एका व्यक्तीने सर्वप्रथम बास्केट पक्ष्यांसमोर ठेवले, नंतर त्याने बॉल पक्ष्यांच्या दिशेने फेकला. पक्ष्यांनी पळत जाऊन बॉल पकडला आणि चेंडू चोचीत पकडून चिमुकल्या बास्केट पोस्टमध्ये टाकला. पक्ष्यांनी बास्केटबॉल सामन्याचा खूप आनंद लुटला आणि सोशल मीडिया युजर्सला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहायला आवडतो आहे.